या तीन टेस्टमुळेच शिवसेना पक्ष शिंदे गटाचा, नीरज कौल यांच्या युक्तिवादामुळे मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या हातातून धनुष्यबाण जाणार?

शिवसेना पक्ष कोणाचा, यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्या युक्तिवादाने पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

या तीन टेस्टमुळेच शिवसेना पक्ष शिंदे गटाचा, नीरज कौल यांच्या युक्तिवादामुळे मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या हातातून धनुष्यबाण जाणार?
eknath shinde court
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 4:35 PM

सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची, यावरून सुनावणी सुरू आहे. मागील काही दिवसांत ठाकरेंच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे वकील नीरज कौल यांनीही ठाकरेंच्या वकिलाचे दावे खोडून पॉवरफुल युक्तिवाद केला आहे. वकील नीरज कौल यांनी मागणी करत विधीमंडळ पक्षाची टेस्ट करण्याची मागणी केली आहे. वकील नीरज कोल यांच्या मागणीने आता उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष कोणाची, यासाठी पहिली टेस्ट संघटना, दुसरी टेस्ट एफिडेविट, तर तिसरी टेस्ट विधीमंडळ पक्ष आहे. यात तिसरी टेस्ट महत्वाची आहे, कारण पूर्वीच्या दोन टेस्टमध्ये प्रॉब्लेम आहे. एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांच्या मागणीने या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. नीरज कौल यांच्या मागणीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून युक्तिवाद 

कौल यांनी पुढे म्हटलं, संघटनेत दोन तृतियांशपैकी अधिक लोक नियुक्त केले जात असतील, तर लोकशाही कुठे आहे, असा सवाल कौल यांनी विचारला. ही तर एकाधिकारशाही आहे, असा आरोप करण्यात आला. कार्यकर्त्यांना संघटनेत काय चाललंय, यावर बोलण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2018 घटनेत बदल करण्यात आले, ते देखील निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाही. 2018 साील ज्या नियुक्त्या झाल्या, त्यात लोकशाही नाही, असा युक्तिवाद कौल यांनी केला. यावेळी त्यांनी ठाकरेंचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. 2018 साली काही नियुक्त्या पक्षांतर्गत झाल्या होत्या. त्या लोकशाहीनुसार झाल्या नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. ठाकरेंकडून पक्षाला वैयक्तिक व्यवस्थेप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न झाला, असेही कौल यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टात आपण न्यायिक आढावा घेत आहोत, असाही युक्तिवाद त्यांनी केला. ठाकरेंच्या वकिलांनी तीसरी टेस्ट विधीमंडळाविषयही भाष्य केलं. या टेस्टमुळे ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण निसटणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us