AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : सल्ले देण्यासाठी हिंदू सणच मिळतात, दिया मिर्झासारखे…नितेश राणेंचा संताप, ‘त्या’ व्हिडिओवरून टीका

Nitesh Rane On Dia Mirza : भाजप नेते नितेश राणे यांनी दिया मिर्झा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे.

Nitesh Rane : सल्ले देण्यासाठी हिंदू सणच मिळतात, दिया मिर्झासारखे...नितेश राणेंचा संताप, 'त्या' व्हिडिओवरून टीका
| Updated on: Nov 02, 2026 | 5:36 PM
Share

मुंबईत प्रदूषणमुक्त दिवाळीला प्रोत्साहन देणारी एक मोहीम अचानक राजकीय वादळात बदलली. बीएमसीनं बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला. या संपूर्ण प्रकरणामुळे आता सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं आहे. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) लोकांना फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. हा संदेश पसरवण्यासाठी, बीएमसीनं बॉलिवूड आणि क्रिकेटमधील अनेक प्रमुख व्यक्तींची मदत घेतली. दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांसारख्या कलाकारांनी लोकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करणारे व्हिडिओ बनवले. मात्र, जेव्हा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. या प्रकरणावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित साटम यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दिया मिर्झावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिलं की, ‘दिवाळी कशी साजरी करावी हे दिया मिर्झाकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही. आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत.’ साटम यांच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली. बीएमसीनं तात्काळ दिया मिर्झाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला. मात्र, व्हिडिओ का काढण्यात आला याचं अधिकृत स्पष्टीकरण बीएमसीनं अद्याप दिलेलं नाही. यामुळे या वादाला आणखी खतपाणी मिळत आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

माध्यमांशी बोलताना दिया मिर्झा प्रकरणावर नितेश राणे म्हणाले की, ‘पर्यावरण हे फक्त होळी आणि दिवाळीच्या वेळीच खराब होतं. ईद आणि मोहरमच्या वेळी खराब होत नाही. बकरे कापताना खराब होत नाही, मोहरमच्या वेळी जेव्हा प्राण्यांना इजा पोहचवली जाते, तेव्हा पर्यावरण खराब होत नाही. रमजानच्यावेळी जेव्हा सगळीकडे घाण होते, तेव्हा पर्यावरण खराब होत नाही. म्हणून अशा पद्धतीचे सल्ले देण्यासाठी हिंदू सणच त्यांना मिळतात. दिया मिर्झासारखे लोक जे सातत्याने हिंदू धर्मावर टीका करण्याचे प्रयत्न करतात, त्यांना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिलं जात असेल, तर या बाबतीत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत.’

Follow Us
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा