AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजन विचारेंमुळेच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात, त्यांनीच दिघेंना…; संजय राऊतांचा मोठा खुलासा

शिवसेना शिंदे गटाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्या जाहिरातीत आनंद दिघे यांचा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी असल्याने ठाकरे गटाने तीव्र निषेध केला. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यावर जोरदार टीका केली,

राजन विचारेंमुळेच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात, त्यांनीच दिघेंना...; संजय राऊतांचा मोठा खुलासा
| Updated on: Sep 19, 2025 | 11:21 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त असलेली शिवसेना शिंदे गटाने एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो जाहिरातीमध्ये लावण्यात आला होता. यावरुन ठाकरे गटाने शिंदेंवर टीका केली होती. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते.त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊतांनी केला होता. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा कट असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला होता. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उत्तर देताना दिघेसाहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, असे म्हटले होते. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, राजन विचारे यांच्याबद्दल भाष्य केले. माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. कोणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि माझ्यावर एखादी टीका केली, तर मी नक्कीच मान्य करेन. पण ज्याने पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली त्यांनी हे धंदे करु नये, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे

एकनाथ शिंदे आज जे काही आहेत ते राजन विचारेंच्या त्यागामुळे आहेत. राजन विचारेंनी त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत. त्याबद्दल एकनाथ शिंदेंनी रोज राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे. राजन विचारे सभागृह नेते होते. एकनाथ शिंदेंच्या घरी दुर्दैवाने दुर्घटना घडली. ते सैरभैर झाले होते. दु:खात होते. त्यांना दु:खातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की एकनाथ शिंदे आपला कार्यकर्ता आहे. त्याच्या घरी दुर्घटना घडली आहे. त्यांच्या दोन मुलांचे निधन झालं आहे. आपण त्यांना सभागृह नेते करुन त्यांना आपल्या कामात सहभागी करुन घेऊया. हा राजन विचारेंचा त्याग आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली. हे असे प्रसंग आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

त्यांना आनंद दिघे काय माहिती

हे आम्हाला काय निष्ठेच्या गोष्टी सांगतात. त्यांची जे लफंगे पोर रस्त्यावर उतरली आहेत, त्यांना आनंद दिघे काय माहिती आहेत. त्यांना राजन विचारे, सतीश प्रधान, मु दा जोशी हे त्यांना माहिती आहेत का, हा पक्ष तिथे कोणी उभा केला. काल जे उतरले ते बहुसंख्य ठेकेदारांची पोरं होती. लाभार्थी होते. मधल्या काळात अनेक ठेकेदार निर्माण केले आहेत. शिवसेनेचे श्रेय त्यांच्या पोरांना देऊ नका. त्यांना दोन्ही वेळेला उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीतून खासदार केले. त्यांचे कतृत्व काय होते, असे संजय राऊत म्हणाले.

माझ्या नादाला लागू नका. माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. कोणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि माझ्यावर एखादी टीका केली, तर मी नक्कीच मान्य करेन. पण ज्याने पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली त्यांनी हे धंदे करु नये. काल त्यांनी जे आंदोलन केले, त्यालाच त्यांनी ५० लाख खर्च केले असतील, अशीही टीका संजय राऊतांनी केली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता