वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्याची मारहाण

वीज बिल वसुलीला गेलेले महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ तारासिंह राठोड (48 वर्ष) यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप आहे

Mahavitaran employee, वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्याची मारहाण

नागपूर : शिवसेनेच्या कार्यकर्त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वीज बिल वसुलीला गेलेले महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ तारासिंह राठोड (48 वर्ष) यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप आहे (Shivsena volunteer beat Mahavitaran employee).

नागपुरातील प्रकाश नगर डिप्टी सिग्नल परिसरात 13 फेब्रुवारीला महावितरणचे पथक त्या भागातील थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. त्या भागात राहणारे निर्मलकर यांचे 1 वर्षाचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणचे तारासिंह राठोड यांनी वीज बिल भरण्यास सांगितले, तेव्हा दयानंद निर्मलकर यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता राकेश भारतीला बोलावले.

शिवसेना लिहिलेल्या गाडीमध्ये आलेल्या राकेश भारती याने दयानंद निर्मलकर यांच्यासोबत मिळून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप महावितरणचे तारासिंह राठोड यांनी केला आहे.

या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात शिवसेना कार्यकर्ता राकेश भारती आणि दयानंद निर्मलकर यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *