AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात शाळेत खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृ्त्यू,चौकशीची पालकाची मागणी

जळगावातील एका शाळेत खेळताना अचानक खाली कोसळून नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पालकांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली आहे.

जळगावात शाळेत खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृ्त्यू,चौकशीची पालकाची मागणी
| Updated on: Jul 11, 2025 | 9:27 PM
Share

जळगावातील एका शाळेत खेळताना अचानक जमीनीवर कोसळल्याने एका नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने या प्रकरणात शाळेच्या सीसीटीव्हींची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका पालकांनी घेतल्याने आता उद्या मुलाचे पोस्टमार्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगावच्या आरआर विद्यालयात खेळताना अचानक जमिनीवर कोसळल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला आहे.कल्पेश वाल्मीक इंगळे असे मृत्यू पावलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगावातील कासमवाडी येथील रहिवासी आहे. कल्पेश दुपारी जेवणाचा डबा खाल्ल्यानंतर शाळेत मैदानावर खेळत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कल्पेश याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहीतीनुसार खेळताना चक्कर येऊन पडल्याने कल्पेशचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आमच्या मुलाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीसाठी तब्बल पाच तासापासून कुटुंबीय शाळेतच ठाण मांडून होते. पोलीस उपअधीक्षकांनी या शाळेला भेट देत सीसीटीव्ही आणि डीव्हीआरचा डाटा सोबत घेतला आहे. त्याचीही तपासली केली जाणार आहे.

तब्बल पाच ते सहा उलटूनही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.त्यामुळे रात्र झाल्याने आता सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे.पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मुलाला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप असून शाळेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा