तू गल्लीत दिस उचलून नेतो, 38 वर्षीय शेजाऱ्याची मुलीला धमकी, हादरवणारा प्रकार, थेट..

नुकताच एक कोणीही विचार करणार नाही, अशी घटना घडली आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. धुळ्यातील हा प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला. गंभीर आरोप कुटुंबियांकडून केली जात आहेत.

तू गल्लीत दिस उचलून नेतो, 38 वर्षीय शेजाऱ्याची मुलीला धमकी, हादरवणारा प्रकार, थेट..
Dhule
| Updated on: Nov 25, 2026 | 9:31 AM

धुळे शहरात झोप उडवणारी घटना घडली आहे. गल्लीत दिसली तर उचलून नेईल. अशी धमकी 38 वर्षाच्या शेजाऱ्याने 14 वर्षीय मुलीला दिली. तो मागील काही दिवसांसाठी लग्नासाठी तगादा या मुलीकडे लावत आहे. यासोबतच धर्मांतरासाठी दबाव देखील टाकत असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका 38 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 38 वर्षीय आरोपी अख्तर गुलाब मिर्झा हा मागील काही दिवसांपासून शेजारी राहणाऱ्या मुलीच्या मागे लागला. तो 14 वर्षीय मुलीची झेड काढत होता. लग्नासाठी तो हातपाय धुवून मागे लागला. तो सातत्याने धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होता. नकार देऊनही तो लग्नासाठी तगादा लावत होता. गल्लीत दिसली तरीही उचलून नेणार असल्याचेही त्याने म्हटले.

हेच नाही तर 20 हजार रूपये देतो, असेही त्याने म्हटले होते. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीला समज देखील दिली. हेच नाही तर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. रात्री अंगणात पीडित भांडी घासत होती. त्यावेळी आरोपीने तिला गल्लीत दिसली तरीही उचलून नेणार असल्याचे म्हटले. आरोपीच्या बहिणीने पिडितेच्या भावाला धमकी दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Loading...

सावरगावमध्ये मंदिरातील पुजाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा मंदिरातील घटना. पुजाऱ्याला मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मारहाणप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल.तर मारहाण झालेल्या पुजाऱ्याच्या घरातीलही पाच जणांवरही तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील कांडगेवस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याने चक्क कोंबड्यांच्या जाळीत शिरून हल्ला केला. मात्र, कोंबड्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या स्वतःच जाळीत अडकला. बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न करूनही त्याला बाहेर निघता आले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अखेर वनविभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने या बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us