Supriya Sule : रोहित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या गुप्त बैठकीवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule : रोहित पवार यांनी नागपूरमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची बातमी आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रोहित पवार यांना हिवाळी अधिवेशन काळात नागपूरमध्ये विधान भवनावर शेतकरी मोर्चा काढायचा आहे. पण त्यावर सुप्रिया सुळे नाराज असल्याच बोललं जातय. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वीच नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. यावर आज खासदास सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, रोहित पवार आणि गुप्त बैठक, म्हणजे काय. रोहित पवार काल नागपूरला गेले होते. त्यांचं लाइव्ह लोकेशन चेर करा. हे हास्यास्पद आहे. पक्षाची गुप्त बैठक वैगेर हास्यास्पद आहे अशी सु्प्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया होती.
(बातमी अपडेट होत आहे)
