असा कसा प्रसंग आला रे भावड्या… मृत भावाच्या हाताला राखी बांधताच हंबरडा फोडला, अख्खं गाव ढसाढसा रडलं

शनिवारी रक्षाबंधन होते आणि त्याच दिवशी आपल्या लहान्या तीन वर्षाच्या भावाला निरोप देण्याची वेळ 9 वर्षाच्या बहिणीवर आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गावावर रक्षाबंधनाच्या दिवशी रडण्याची वेळ आला.

असा कसा प्रसंग आला रे भावड्या… मृत भावाच्या हाताला राखी बांधताच हंबरडा फोडला, अख्खं गाव ढसाढसा रडलं
Ayush died
| Updated on: Aug 10, 2025 | 2:26 PM

नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात रक्षाबंधनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडलीये. या घटनेने संपूर्ण गावात दु:खाचे वातावरण बघायला मिळतंय. कुटुंबिय रक्षाबंधनाच्या तयारी होते, बहीण आपल्या भावाला राखी बांधायची म्हणून आनंदात आणि उत्साहात होती. मात्र, यादरम्यान असे काही घडले की, आनंदात मोठी विर्जन पडले आणि संपूर्ण गावाला ढसाढसा रडण्याची वेळ आली. पूर्ण देश रक्षाबंधन साजरी करत असताना एका बहिणीला आपला भाऊ जमवण्याची वेळ आली. चक्क मृत भावाच्या हातावर बहिणीने राखी बांधली. 9 वर्षाची बहीण ज्यावेळी मृत 3 वर्षाच्या भावाच्या हातावर राखी बांधत होती, त्यावेळी कोणीही आपले अश्रू लपवून शकले नाही.

शुक्रवारी रक्षाबंधनाच्या एक दिवस अगोदर रात्री दुमाला गावात भगत कुटुंबाचा 3 वर्षाचा आयुष आपल्या घराबाहेर खेळता होता, त्यावेळी अचानक एक बिबट्या आला आणि त्याच्यावर झडप घालून त्याला घेऊन गेला. ही माहिती कळताच लोकांनी आयुषचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, त्यानंतर काही वेळात आयुषचा मृतदेह त्यांच्या घराजवळ भेटला. आयुषचा मृतदेह पाहून घरच्यांना मोठा धक्का बसला.

शनिवारी रक्षाबंधन होते आणि त्याच दिवशी आपल्या लहान्या तीन वर्षाच्या भावाला निरोप देण्याची वेळ 9 वर्षाच्या बहिणीवर आली. हीच बहीण आपल्या भावाला अगोदरच्या दिवशी राखी बांधण्यास इतकी इच्छुक होती की, ती भावासाठी राखीची पुर्ण तयारी करत होती. कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारची तयारी केली जात होती. कोणालाच काहीच कळत नव्हते. लोक आयुषला घेऊन जात होते, त्यावेळी बहीण तिथे पोहोचली.

यावेळी आपल्या भावाला पाहून तिने ढसाढसा रडण्यास सुरूवात केली. 9 वर्षाच्या बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली. ज्यावेळी ती मृत भावाला राखी बांधत होती, त्यावेळी अख्खा गाव रडत होता. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मृत भावाला राखी बांधण्याची वेळ बहिणीवर आली.