AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं कसं न सांगता निघून गेलात… रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर

रक्षाबंधनाच्या शुभदिवशी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या लाडक्या मावसभावाचे, बाळराजे माळी यांचे अकस्मात निधन झाले. रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

असं कसं न सांगता निघून गेलात... रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर
| Updated on: Aug 10, 2025 | 2:15 PM
Share

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा लाडका मावस भाऊ बाळराजे माळी यांचे काल (९ ऑगस्ट) रात्री दुःखद निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे चाकणकर कुटुंबियांवर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर शोककळा पसरली आहे. बाळराजे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुपाली चाकणकर यांच्या पोस्टमध्ये काय?

रूपाली चाकणकर यांनी आपल्या लाडक्या भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर एका भावूक पोस्ट लिहिली आहे. “बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच “माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप…” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

बाळराजे माळी यांचा अल्पपरिचय

बाळराजे माळी हे आपल्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या या स्वभावगुणामुळे कुटुंबात आणि मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. चाकणकर यांच्यासाठी ते केवळ मावस भाऊ नव्हते, तर एक जवळचे मित्र आणि आधार होते. रक्षाबंधनाच्या दिवशीच हे दुःखद वृत्त समजल्यामुळे चाकणकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. भावा-बहिणीच्या खास सणाच्या दिवशी अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चाकणकर कुटुंबीयांच्या आयुष्यात मोठी पोकळी

बाळराजे माळी यांच्या निधनामुळे चाकणकर कुटुंबीयांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी बाळराजे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत चाकणकर कुटुंबीयांप्रती सहानुभूती दर्शवली आहे. बाळराजे माळी यांच्या निधनाने माळी कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी, राजकीय मतभेद बाजूला सारून अनेक मान्यवरांनी शोकसंदेश पाठवले आहेत. त्यांच्या निधनाने मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?