केतन अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट सियाचा भाऊ साहिल गोयलच..

केतन अग्रवाल प्रकरणात काल कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही आरोपींना तब्बल 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्याने गोयल कुटुंबियांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

केतन अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट सियाचा भाऊ साहिल गोयलच..
Ketan Agarwal case
| Updated on: Jun 30, 2026 | 8:15 AM

केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. काल दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यादरम्यान कोर्टाने आरोपींना 7 दिवसाची कोठडी सुनावणी. आरोपींच्या वकिलांनी या कोठडीला विरोध केला. पण सरकारी वकिलांनी मांडलेल्या बाजूनंतर 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांनी काही मोठे दावे केले. केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल लोहगडावर फिरण्यासाठी केले होते. सिया वारंवार केतनला लोहगडावर घेऊन जात. 18 जूनला तिने केतनला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने धक्का दिला. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर स्पष्ट झाले की, ही हत्या आहे. सिया गोयल हिच्याकडून अनेकदा केतनला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी तुझ्या एकटीकडून होणार नाही म्हणत चेतनही गडावर पोहोचला.

बालीला लग्नाचे प्री वेडिंग शूट करण्यासाठी जाण्याचा केतन आणि सियाच्या घरच्यांचा प्लान होता. मात्र, सियाला बालीला जायचे नव्हते. बालीला जाणे टाळण्यासाठी तिने थेट केतनचा पासपोर्ट मुद्द्याम गहाळ केला. ज्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावरून परतावे लागले. यादरम्यान कॅब चालकाने सियाला गाडीतून पासपोर्ट काढताना बघितले होते.

आता चेतन आणि सिया गोयल यांच्यापेक्षा सिया गोयल हिचा भाऊ साहिल याच्या भोवती तपास फिरताना दिसत आहे. ज्यावेळी बाबीला हे जाण्यासाठी निघाले होते, त्यावेळी सिया आणि साहिल यांच्यात वाद सुरू होते, केतनच्या घरापर्यंत जाऊपर्यंत. सियाला बाबीला जायचे नव्हते, साहिलने तिला बळजबरी गाडीत बसवले. यासोबतच साहिल याचे मित्र चेतन आहे.

साहिलची क्रिकेट मॅच बघायला गेल्यावरच चेतन आणि सियाची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोनच महिन्यात सियाचा साखरपुडा झाला. यामुळे चेतन आणि सिया यांच्या नात्याची पूर्ण माहिती साहिलला असल्याचा संशय पोलिसांना आहे. साहिलने यापूर्वी चाैकशीत काही गोष्टी मान्य केल्या आहेत. साहिल गोयल याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच पोलिस आता साहिलला चाैकशीसाठी बोलावू शकतात.

Follow Us