…. त्यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही, श्रीहरी अणेंचा हल्लाबोल

विदर्भात शिवसेना आपले पाय रोवू शकत नाही,याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही” अशी टीका ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे (Shrihari Aney) यांनी केली.

.... त्यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही, श्रीहरी अणेंचा हल्लाबोल
श्रीहरी अणे
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 11:58 AM

नागपूर : “नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला ( Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळणार नाही. विदर्भात शिवसेना आपले पाय रोवू शकत नाही, त्यामुळे हे नाव देण्यात आलं आहे, याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही” अशी टीका ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे (Shrihari Aney) यांनी केली. (Shrihari Aney attacks on shiv sena over Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park rename)

नुकतंच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. मात्र याला विदर्भवाद्यांनी विरोध केला आहे. त्यावर विधीज्ञ श्रीहरी अणे यांनीही टीकास्त्र सोडलं.

“गोंडवाना देण्याची मागणी नाही. गोंडवाना हे नावच आहे. गोरेवाडा हे नाव आहे. आपल्या विदर्भात गोंडाचं सहाशे वर्ष राज्य झालं. ही गोंडांची राजधानी होती एकेकाळची. गोंड हे इथले मूळचे होते. इंग्रजांच्या पूर्वीपासून गोंडवाना म्हटलं जायचं. याला ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव बदलून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता. हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठी आहे. त्यांना या भूमीत पाय रोवता येत नाहीत, याची शिवसेनेला पूर्ण कल्पना आहे. मात्र लोकांच्या मनात नावं बदलून परिवर्तन होणार नाही. विदर्भवाद्यांचा आवाज हा दाबण्यात येणार हे नवीन नाही. हे अपेक्षित होतं”, असं श्रीहरी अणे म्हणाले.

विदर्भावाद्यांनी आंदोलनं केली तर विदर्भासाठी आंदोलन केलं असं त्याचं वार्तांकन होत नाही, तर कायदा सुव्यवस्थेसाठी अटक असं केलं जातं. तोडफोड-जाळपोळीच्या नावाखाली अटक केलं जातं. स्थानिक चॅनल्स त्याबाबत माहिती देतात. मात्र त्याचा एक शब्दही पश्चिम महाराष्ट्रातील मीडियात येत नाही, असा आरोपही श्रीहरी अणे यांनी केला.

दिल्ली आंदोलनावरही भाष्य 

“दिल्लीत घडलेल्या हिंसक घटनेचं कुणीही समर्थन करु शकत नाही, पण यामुळे मूळ प्रश्न बाजूला राहतो. आता सर्व बाजूला ठेऊन शेतकरी आंदोलनामुळे मागण्यांवर फोकस करणं गरजेचं आहे” असंही श्रीहरी अणे म्हणाले. कोणी केलं, का केलं याच्यात जाण्यापेक्षा आंदोलनातील मुद्द्यांवर लक्ष द्यायला हवं. कुणालाही कायदा हातात घेता येत नाही, किंबहुना तो घेऊ नये. जर तसं झालं असेल तर उचित कारवाई पोलिसांनी करावी, असं श्रीहरी अणे म्हणाले.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेबांचं नाव

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला देण्यात आलं आहे. त्याला विदर्भवाद्यांनीविरोध दर्शवत आंदोलन केले. मात्र आंदोलन स्थळी पोलिसांनी अभूतपूर्व असा बंदोबस्त लावला होता. आंदोलन सुरु होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. बाळासाहेब ठाकरे हे वेगळ्या विदर्भ राज्याच्या विरोधात होते, त्यामुळे या प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात येऊ नये अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली होती.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे नागपूर शहरालगत लागून आहे. त्याला आता बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. हे संग्रहालय 1900 हेक्टरवर पसरलं आहे. मात्र आता पहिल्या टप्प्यात 145 हेक्टरवर इंडियन सफारी सुरू करण्यात येत आहे. यात चार भागात प्राण्यांचं दर्शन होणार आहे. पहिला भाग म्हणजे लेपर्ड सफारी या ठिकाणी सध्या चार बिबटे सोडण्यात आले आहेत. ते या ठिकाणी मुक्त संचार करत आहेत. दुसरा भाग म्हणजे अस्वल सफारी. इथे चार अस्वल आहेत. तिसरा भाग म्हणजे हरीण सफारी. या ठिकाणी हरिणाचे कळप आपल्या स्वागतासाठी पाहायला मिळतात. चौथा भाग म्हणजे टायगर सफारी या ठिकाणी दोन वाघ सोडण्यात आले आहेत.

इंडियन सफारी आता सुरू होत असून त्याचा फायदा पर्यटनाला होणार आहे. भविष्यात याठिकाणी नाईट सफारीपासून वेगवेगळ्या सफारी सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी 40 सीटर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा सफारीसाठी करण्यात आली.

VIDEO : श्रीहरी अणेंचा हल्लाबोल

(Shrihari Aney attacks on shiv sena over Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park rename)

संबंधित बातम्या   

3 महिन्यात पाच जणांचा बळी, नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.