
देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन सुरु झाले. काही लोकांचा अट्टहास असतो राजकारण्यासोबत त्यांना संमेलन कराये असते. परंतु माझी अपेक्षा राजकारण्यांशिवाय संमेलन करावे, अशी आहे. महाराष्ट्रावर मराठी माणसावर देशावर अडचणी आल्या तेव्हा कोणत्याही मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही. साहित्यिकांनी भूमिका मांडल्या नाही, अशा प्रहार शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी साहित्यिकांवर केला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार एकत्र आले. त्यावर राऊत यांनी टीका केली.
महाराष्ट्रवर, मराठी माणसांवर, देशावर जेव्हा संकट आले तेव्हा मराठी साहित्यिक आणि कलाकारांनी आवाज उठवला नाही. भूमिका कधीच घेतल्या नाही. अलीकडे साहित्यिक आणि कलवतांनी भूमिका घेणे बंद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यामुळे त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी कसे बसू दिले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मोदी यांच्या भाषणांत जो मी आहे तो अत्यंत घातक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा विधानसभेच्या निवडणुकींआधी दिला.
साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावर राजकारण झाले. काही लोकांचा साहित्य संमेलनात राजकारण करण्याचा अट्टाहास असतो. साहित्यिकांनी एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय करावे. पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते, असे राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांचे निलंबन झाले. राहुल गांधींना खासदारकी सोडावी लागली. मग हा न्याय हा सगळ्यांसाठी सारखा का नाही? विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय आहे, असे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दिल्लीत मराठी संमेलन सुरु आहे. शरद पवार मोदी यांच्या बाजूला आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. तिन्ही नेते दिल्लीत आहेत. त्यांनी बेळगावचा वाद सोडवला पाहिजे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोदी यांची भेट घेऊन हा वाद सोडवला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.