सायन- प्रतिक्षानगरात आगीने सिलिंडर स्फोट झाल्याने खळबळ, नागरिकात घबराट
सायन येथील प्रतिक्षा नगर पोलीस क्वार्टर्सच्या मागे झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

फटाक्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून मंगळवारी रात्री सायनच्या प्रतिक्षानगर भागात पोलिस क्वार्टर्सच्या मागील चाळीत लागलेल्या आगीत तीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात कोणतीही हानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याचे म्हटले जात आहे.
सायन येथील प्रतिक्षा नगर पोलीस क्वार्टर्सच्या मागे झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात घबराट पसरली असून अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रतिक्षानगर (पोलीस क्वार्टर्स) येथील एल- ५ इमारतीच्या मागे ही सिलेंडर स्फोटाची घटना घडली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाची पथके आणि वडाळा टीटी पोलीस घटनास्थळी उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.