
मोबाईल आता काळाची गरज झाली आहे. कोणतंच काम मोबाईल शिवाय पूर्ण होणं आता शक्य नाही. एकंदरीतच काय तर, मोबाईल व्यक्तीच्या आयुष्यात फार महत्त्वाचा घटक झाला आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलं आहे असं आपण म्हणतो… पण याचे तोटे देखील आता जाणवू लागले आहे. लोकांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर आणि नात्यावर देखील होताना दिसत आहे. याला पर्याय काय? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तर महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जिथे रोज संध्याकाळी सात वाजता सायरन वाजतो आणि त्यानंतर पुढचे 2.30 तास कोणात स्क्रिनवर वेळ घालवायचा नाही… असा नियमच आहे. महाराष्ट्रातील हे गाव दुसरं तिसरं कोणतं नसून सांगली आहे. सायबर दोस्त I4C द्वारे X वरील पोस्टनुसार, गावकरी दिवसातून अंदाजे 2:30 तास डिजिटल डिटॉक्स पाळतात.
सायबर दोस्त I4Cने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं आहे की, महाराष्ट्रातील सांगली गावात दररोज संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजतो. त्यानंतर, अडीच तासांचा डिटॉक्स प्रत्येक गावकऱ्याला पाळावा लागतो… डिजिटल डिटॉक्ससाठी प्रत्येकाने त्यांच्या स्मार्टफोन आणि गॅझेट्सपासून दूर राहणं आवश्यक आहे. या काळात गावकरी एकमेकांशी संवाद साधतात. तंत्रज्ञानाला आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवू द्यायचं नाही… हेच यातून सिद्ध होत आहे.
महाराष्ट्र के सांगली गांव में हर दिन शाम 7 बजे सायरन बजता है, जिसके बाद 2.5 घंटे का Digital Detox अपनाया जाता है
इस दौरान mobile और gadgets से दूरी बनाकर लोग आपस में समय बिताते हैं
यह पहल हमें सिखाती है कि technology हमारे जीवन को नियंत्रित न करे#DigitalWellbeing #CyberAlert pic.twitter.com/kJ7nKryVwZ
— CyberDost I4C (@Cyberdost) December 23, 2025
सांगली गावाबाहेर राहणारे लोक देखील डिजिटल डिटॉक्स करू शकतात. त्यांना काही नियम तयार करावे लागतील आणि त्यांचे पालन करावे लागेल.
मोबाईल फोन आणि गॅझेट्सपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला एक वेळ निश्चित करावी लागेल.
दररोज, त्या काळात तुम्हाला टीव्ही, गॅझेट्स किंवा लॅपटॉपपासून दूर राहावे लागेल.
सुरुवातीला, दिवसातून 30 – 60 मिनिटं तुमच्या स्मार्टफोनपासून दूर राहा.
झोपण्यापूर्वी 30 मिनिटे तुमचा स्मार्टफोन बंद करा.
स्मार्टफोनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर नियंत्रण ठेवा.
घरात फोन-मुक्त क्षेत्र तयार करा. सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा.
लोक टेलिव्हिजन आणि इतर माध्यमे देखील टाळतात.
सांगली गावातील रहिवासी या काळात टेलिव्हिजन पाहणे देखील टाळतात. त्यानंतर, ते कुटुंब, परिसर आणि इतर सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करतात. संपूर्ण गाव डिजिटल डिटॉक्सचे नियम पाळतात… असं देखील समोर आलं आहे.