एसआयटीचं पथक अंतरवालीत, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता जरांगेंकडून थेट.., बडा नेता अडचणीत

अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. 500 कोटी रुपायंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात आता एसआयटी पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येतीये. जरांगे पाटलांकडून मोठी मागणी करण्यात आली आहे.

एसआयटीचं पथक अंतरवालीत, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता जरांगेंकडून थेट.., बडा नेता अडचणीत
manoj jarange
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 7:49 PM

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलीच खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत दिले, असा उल्लेख या कथित ऑडिओ क्लिपमध्ये होता. या ऑडिओ क्लिपमुळे वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर थेट या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटी नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेलं एसआयटीचं पथक अंतरवाली सराटीमध्ये  आल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीचं पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याने मनोज जरांगे पाटील हे आपला छत्रपती संभाजीनगर येथील दौरा आटपून तातडीने अतंरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.  एसआयटी का कोणी तरी आलं आहे, त्यांचा मला फोन आला होता, अशी माहिती यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Loading...

दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली ती दोन वर्ष जुनी असल्याचा देखील त्यांनी दावा केला होता.

दरम्यान आता या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी कदम यांच्या  देखील चौकशीची मागणी केली आहे. एसआयटीने कदम यांची देखील चौकशी करावी. कारण आपण जी ऑडिओ क्लिप ऐकली ती कदम यांनी पण ऐकली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी आता कदम यांच्या चौकशीची मागणी केल्यामुळे त्यांच्या देखील अडणी वाढण्याची शक्यता आहे.  एसआयटीने आपल्याला ती ऑडिओ क्लिप मागितली तर आपण ती त्यांना देऊ, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us