
भक्ती आणि श्रद्धेपोटी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेल्या पनवेलच्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ शहराजवळील देवडी पाटी येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला. यात पाच जणांचा जागीच अंत झाला. या अपघाताने संपूर्ण पनवेल परिसरावर शोककळा पसरली आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईतील पनवेल परिसरात राहणारे हे सहा मित्र आणि नातेवाईक एका खाजगी कारने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना मोहोळ तालुक्यातील देवडी पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. भरधाव वेगात असलेली कार महामार्गाच्या कडेला असलेल्या एका जुन्या मोठ्या झाडावर प्रचंड वेगाने आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे गाडीतील प्रवाशांना बाहेर निघण्याची संधीही मिळाली नाही.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
या दुर्दैवी घटनेत विशाल भोसले, अमर पाटील, आनंद माळी, अर्चना भंडारे आणि माला साळवे यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण पनवेलमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचे समजते. या अपघातात ज्योती टकले ही महिला सुदैवाने बचावली असली तरी ती गंभीर जखमी आहे. मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक तातडीने मदतीसाठी धावले. यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मोहोळ पोलिसांना फोन केला. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात हलवले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात पहाटेच्या वेळी झाला. त्यामुळे चालकाला आलेली डुलकी किंवा वाहनाचा टायर फुटल्याने झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान देवडी पाटी हा भाग अपघातांसाठी धोकादायक ठरत असून, या ठिकाणी वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. मोहोळ पोलीस सध्या या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.