होय, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच; राष्ट्रवादीच्याच आमदारांना फक्त भरीव निधी; नारायण आबा पाटील यांनी केले बंडखोरांचे समर्थन

| Updated on: Jun 26, 2022 | 6:17 PM

शिवसेनेतून बंडखोरी झाली ही गोष्ट वाईट असली तरी, शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सेनेतील आमदार नाराज होते. त्याबद्दल बोलताना सांगितले की, पक्ष नेतृत्वाने वेळीच लक्ष दिले नसल्याने शिवसेनेवर ही वेळ आली आहे अशी टीका त्यांनी शिवसेनेवरच केली आहे.

होय, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच; राष्ट्रवादीच्याच आमदारांना फक्त भरीव निधी; नारायण आबा पाटील यांनी केले बंडखोरांचे समर्थन
सोलापुरचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे केले समर्थन
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सोलापूरः बंडखोर आमदारांमुळे (Rebel MLA) आता दिवसेंदिवस राज्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापत आहे. शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या आमदारांमुळे आता राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलण्याच्या अवस्थेत असतानाच शिवसेनेचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंतही आज एकनाथ शिंदे यांच्या गोठात गेल्याच्या घटनेने पुन्हा एकादा शिवसेनेला धक्का बसला आहे. उदय सामंत गुवाहाटीला पोहचतात न पोहचताच ते करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील (Former MLA Narayan Aba Patil) यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवेसेनेला डावलण्याचे काम केले असल्याची टीका करत त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

शिवसेनेवर टीका करत असतानाच त्यांनी होय मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांसोबतच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

आमदारांना वेळोवेळी मदत

शिवसेनेतून एवढ्या आमदारांनी बंडखोरी का केली यावर सांगताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या आमदारांना वेळोवेळी मदत केली आहे. शिवसेनेतील आमदारांना अडी अडचणींच्या काळात साथ दिल्यामुळेच आमदार आणि राज्यमंत्रीदेखील एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्याचेच त्यांनी सांगितले.

नेतृत्वाने वेळीच लक्ष दिले नाही

शिवसेनेतून बंडखोरी झाली ही गोष्ट वाईट असली तरी, शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सेनेतील आमदार नाराज होते. त्याबद्दल बोलताना सांगितले की, पक्ष नेतृत्वाने वेळीच लक्ष दिले नसल्याने शिवसेनेवर ही वेळ आली आहे अशी टीका त्यांनी शिवसेनेवरच केली आहे.

विकासाबद्दलही वरिष्ठांकडून दुर्लक्ष

आमदारांच्या निधीबद्दल आणि त्यांच्या मतदारसंघातील विकासाबद्दलही वरिष्ठ मंडळीकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पक्षाच्या आमदारांकडे लक्ष दिले नसल्यामुळेच ही बंडखोरीची खदखद समोर आली आहे असंही त्यांनी सांगितले.

…म्हणून बंडखोरांचा पाठिंबा

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरही टीका केली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना फक्त भरीव निधी दिला आहे. तर यावेळी मात्र सेनेच्या आमदारांना कुणीच वाली नव्हता, त्यामुळे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील आमदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले, हे सांगत असतानाच आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘होय मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच’ असल्याचे सांगितले.