Madha : माढ्याच्या वडशिंगे गावात 78 वर्षानंतर बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडीत, महाविकास आघाडीचं पॅनल विजयी

| Updated on: Apr 28, 2022 | 3:48 PM

महाराष्ट्रात अनेक अशा ग्रामीण भागात सोसायटी आहेत. तिथं अद्याप निवडणूक झालेली नाही. सोसायटी ही शेतकऱ्यांच्या विकासाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम सोसायटी करते.

Madha : माढ्याच्या वडशिंगे गावात 78 वर्षानंतर बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडीत, महाविकास आघाडीचं पॅनल विजयी
माढ्याच्या वडशिंगे गावात 78 वर्षानंतर बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडीत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर – माढा (Madha) तालुक्यातील वडशिंगे (Vadashinge) गावची सहकारी संस्थेच्या सोसायटीची निवडणूक झाली. त्यामध्ये महाविकास आघाडी पॅनलच्या 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. वडशिंगे गावात 1944 सालानंतर प्रथम निवडणुक (Election) लागली होती. काही लोकांनी निवडणुकीची मागणी केल्यामुळे निवडणुक लागली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी गावात गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली. तसेच हालगी वाजवत गावात मोठा जल्लोष केल्याचं व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे. वयोवृद्ध मंडळीनी देखील हालगीवर ठेका धरल्याने मिरवणुकीत एक वेगळीच रंगत होती.

मला कळतंय असं कधी सोसायटीची निवडणुक लागली नव्हती

“निवडणुकीचा निकाल हा सर्व सामान्य जनतेने दिलेल्या गावकऱ्यांचा विजय आहे. संस्थेची स्थापना 1944 साली झालेली असून आजपर्यंत मला कळतंय असं कधी सोसायटीची निवडणुक लागली नव्हती. परंतु ठराविक लोकांनी निवडणुक लागण्यास भाग पाडलं.परंतु सर्वसामान्य जनता, गावकरी, सोसायटीची सगळे सभासद, आमच्या बाजूने आहेत. कौल जनतेने आम्हाला दिला आहे. तेरा पैकी तेरा आमच्या सीट निवडणून आल्या आहेत.”अशी माहिती निवडून आलेल्या एका सोसायटी सदस्याने दिली आहे.

सोसायटी ही शेतकऱ्यांच्या विकासाचा एक महत्त्वाचा दुवा मानला