VIDEO : ‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाण्यावर चक्क महिलेच्या अंगात आलं; पंढरपूरच्या मेळाव्यात नेमकं काय घडलं?

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये गाणं सुरू असताना काही महिलांच्या अंगात आल्याचं दिसून येत आहे, त्यानंतर या महिलांच्या कपाळावर हात ठेवून त्यांना शातं देखील केल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO : राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर चक्क महिलेच्या अंगात आलं; पंढरपूरच्या मेळाव्यात नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2025 | 6:07 PM

पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. या मेळाव्यात करमणुकीसाठी गाणे सुरू असताना चक्क महिलेच्या अंगात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या जेव्हा अंगात आलं तेव्हा या मेळाव्यात पक्षाचं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं सुरू होतं. घडलेल्या या प्रकारची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?  

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.  या मेळाव्याला खासदार सुनेत्रा पवार येणार होत्या, मात्र त्यांना मेळाव्याच्या ठिकाणी येण्यास उशिरा झाला, तोपर्यंत महिलांच्या मनोरंजनासाठी गाणी लावण्यात आली होती, या गाण्यांवर नाचत असताना अचानक महिलेच्या अंगात आल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे जेव्हा या महिलेच्या अंगात आलं तेव्हा तिथे पक्षाचं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं सुरू होतं. अंगात आल्यानंतर काही महिलांनी या महिलेच्या कपाळाला हात लावून तिला शांत केल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान हा व्हिडीओ आता समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात अंधश्रद्धेला खत पाणी घातल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय? 

पंढरपुरात राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्याला खासदार सुनेत्रा पवार उपस्थित राहणार होत्या, मात्र त्यांना मेळाव्यात येण्यासाठी उशिर झाला, त्यामुळे महिलांच्या करमणुकीसाठी काही गाणे लावण्यात आले. गाणे सुरु असतानाच तेथील काही महिलांच्या अंगात आल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे इथे एका महिलेच्या जेव्हा अंगात आलं तेव्हा त्या मेळाव्यात पक्षाचं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं सुरू होतं. या महिलेच्या कपाळावर हात ठेवून तिला शांत करण्यात आल्याचं देखील दिसून येत आहे.

 

व्हिडीओची जोरदार चर्चा 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये गाणं सुरू असताना काही महिलांच्या अंगात आल्याचं दिसून येत आहे, त्यानंतर या महिलांच्या कपाळावर हात ठेवून त्यांना शातं देखील केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान हा व्हिडीओ आता समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात अंधश्रद्धेला खत पाणी घातल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.