मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी

मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे. काही मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता वातावरण तापल्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 3:15 PM

मोठी बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांकडू मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही मंत्री नाराज आहेत. जरांगे पाटील सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना काही मंत्र्यांची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी योग्य समन्वय व्हावा यासाठी सरकारकडून अधिकचे प्रयत्न व्हावे अशी मागणी देखील काही मंत्र्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उद्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक आहे, या बैठकीत या मुद्द्यावरून नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.  ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील हे सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची काही मंत्र्यांची भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी योग्य समन्वय व्हावा यासाठी सरकारकडून अधिकचे प्रयत्न व्हावे अशी मागणी देखील काही मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान आणखी एका मुद्द्यावरून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वातावरण तापू शकतं. तो मुद्दा म्हणजे राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली होती.  त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्ष मुदत देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी थेट बदललेल्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाच्या  मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.  ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे जनसामान्यांमध्ये महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची भावना या मंत्र्यांची आहे.  उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

 

 

Follow Us