AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina – Vicky : पहिली ओळख, प्रेम अन् लग्न… एकमेकांचे कसे झाले विकी कौशल – कतरिना कैफ!

Katrina - Vicky : कशी झाली विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची पहिली ओळख? फार कमी लोकांना माहिती आहे, त्याची लव्हस्टोरी... दोघांच्या लग्नाची बातमी समोर येताच थक्क झाले चाहते, जाणून घ्या एकमेकांचे कसे झाले विकी कौशल - कतरिना कैफ!

Katrina - Vicky : पहिली ओळख, प्रेम अन् लग्न... एकमेकांचे कसे झाले विकी कौशल - कतरिना कैफ!
विकी कौशल - कतरिना कैफ
| Updated on: Aug 31, 2026 | 3:03 PM
Share

Katrina – Vicky : अभिनेत्री कतरिना कैफ हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर, तिच्या अफेअरच्या चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगल्या. पण करतिना हिचं लग्न अभिनेता विकी कौशल याच्यासोबत झालं. विकी आणि कतरिना यांची ओळख बॉलिवूडच्या मोस्ट पॉपुलर कपल पैकी एक आहे. दोघांनी कधीच एखत्र स्क्रिन शेअर केली नाही. पण आज देखील त्यांचे दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात. सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये विकी आणि कतरिना यांनी लग्नाचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर, जेव्हा दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा तर, चाहते थक्कच झाले.

सांगायचं झालं तर, विकी आणि कतरिना यांनी पहिली भेट आहे, मैत्री आणि लग्न… याबद्दल कायम बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. दोघांनी त्यांचं नात फार काळ गुपित ठेवलं. त्यानंतर 2021 मध्ये अखेर लग्नबंधनात अडकले. तर जाणून घ्या त्यांची पहिली ओळख कशी झाली आणि त्यांनी लग्न कसं केलं.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची प्रेमकथा ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय प्रेमकथांपैकी एक आहे. त्यांनी बराच काळ त्यांचं नातं लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवलं होतं. एका मुलाखतीत विकीने सांगितलं होतं की, कतरिनासोबत त्याची पहिली ओळख 2019 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेली. हा शो विकी होस्ट करत होता. याच शोमध्ये कतरिना देखील परफॉर्म करणार होती.

यावेळी दोघांची ओळख बॅकस्टेजवर झालेली आणि ही त्यांची पहिली भेट होती. पहिल्यांदा दोघांनी जगासमोर येत संवाद साधलेला. एवढंच नाही तरस करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कतरिनाने सांगितलं होतं की, तिला वाटतं की ती आणि विकी कौशल यांची पडद्यावरची जोडी चांगली जमेल. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटत राहिले; त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

सुरुवातीपासूनच कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यातील नाते चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय राहिलं. बऱ्याच काळापर्यंत त्यांच्याबद्दल केवळ तर्कवितर्कच लावले जात होतं, पण जेव्हापासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या, तेव्हापासून चाहत्यांचं लक्ष या जोडीकडे लागलं होतं. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कतरिना कैफ म्हणालेली, विकी याच्यासोबत मला पाहायला लोकांना आवडेल.’, शोमधील कतरिना हिचं वक्तव्य ऐकल्यानंतर, खुद्द विकीलाही आश्चर्य वाटलं होतं.

अनेक वर्ष विकी आणि कतरिना ऐकमेकांना डेट करत होते. पण दोघांनी लग्नाआधी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण दोघांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अखेर 2021 मध्ये दोघांनी राजस्थान येथे शाही थाटात लग्न केलं. आता विकी – कतरिना एका मुलाचे आई – वडील आहेत.

Follow Us
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!
ठाकरेंच्या शिवतीर्थावर राऊत दाखल; बंद दाराआड चर्चा, नेमकं काय शिजतंय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या...
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका...
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...
प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप, अचानक...
बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा... प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...