AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

| Updated on: Aug 31, 2026 | 2:28 PM
Share

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली, ठाकरे केवळ नेत्यांना टोमणे मारण्यासाठी व्यासपीठावर येतात, असा आरोप केला. भाजप सुसंस्कृत पक्ष असून, जनतेच्या हितासाठी निर्णय घेतो. राहुल गांधींवरही टीका करत, भाजपने सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिल्याचे राणांनी सांगितले. रुग्णालयाच्या घटनेबाबतही त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.

भाजप सुसंस्कृत पक्ष असून, त्यांच्या बैठका जनतेच्या हितासाठी, युवकांसाठी, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी निर्णय घेण्यासाठी होतात, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. इतर पक्ष आणि भाजपमध्ये हाच मुख्य फरक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उद्धव ठाकरे व्यासपीठावर येतात तेव्हा ते फक्त महाराष्ट्रातील नेत्यांना टोमणे मारण्यासाठी येतात, अशी टीका राणा यांनी केली. ते टोमणे मारण्यात स्पेशलाईझ झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

राहुल गांधींवरही निशाणा साधत, ते मागासवर्गीयांना पुढे करून त्यांचा वापर करतात. राहुल गांधी पप्पूच राहतील, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. भाजपचे कार्यकर्ते आदेशांची अंमलबजावणी करून त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. आम जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी भाजप काम करते, असेही राणा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात आता फोडाफोडी करण्यासाठी काही पक्ष शिल्लक राहिले नाहीत, मुख्यमंत्र्यांचा निर्णयच महत्त्वाचा असेल असेही त्यांनी नमूद केले. नुकत्याच घडलेल्या एका रुग्णालयाच्या दुर्घटनेबाबत बोलताना, चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही राणांनी दिले.

Published on: Aug 31, 2026 02:25 PM

Follow Us