AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदारांचे नाव SIR ड्राफ्टमधून गायब, तुमचं नाव आहे का? असं करा चेक

महाराष्ट्र आणि दिल्लीत विशेष पुनरीक्षण (SIR) अंतर्गत जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तांत्रिक अडचणी, स्थलांतर किंवा फॉर्म जमा न केल्यामुळे ही नावे गायब झाली आहेत. तुमचे नाव नसेल तर काळजी करू नका; ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत फॉर्म ६ भरून तुम्ही दावा सादर करू शकता. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम यादी जाहीर होईल.

महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदारांचे नाव SIR ड्राफ्टमधून गायब, तुमचं नाव आहे का? असं करा चेक
SIRImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 2:53 PM
Share

महाराष्ट्र आणि दिल्लीत आज स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन म्हणजे SIR अंतर्गत ड्राफ्ट वोटर रोल म्हणजे प्रारुप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन केलेली पडताळणी आणि डिजिटायजेशनसाठीचा फॉर्म जमा न होणे आणि इतर तांत्रिक कारणामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे या ड्राफ्ट लिस्टमध्ये आलेली नाहीयेत. गैरहजर, स्थलांतरित, मृत, ड्युप्लिकेट, विदेशी आणि इतर श्रेणीतील नागरिकांची नावे या यादीतून कापण्यात आली आहेत.

दिल्लीत एकूण 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे यादीतून बाहेर आहेत. सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्डच डिजिटाईज झाला आहे. तर महाराष्ट्रात एकूण मतदारांपैकी सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांचे नाव ड्राफ्ट रोलमध्ये नाहीयेत. या मतदारांनी फॉर्म जमा केलेला नाही त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड डिजिटाईज झालेला नाही.

आता काय कराल?

ज्या लोकांची नावे ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये नाही, त्यांची चिंता करण्याची गरज नाही. ज्यांची नावे मतदार यादीत नाही त्यांनी आजपासून म्हणजे 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आपला दावा किंवा हरकत सादर करायची आहे. या दाव्यांची निस्तरण प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदाता यादी जाहीर केली जाणार आहे.

नाव कुठे चेक कराल?

तुमचं नाव जर ड्राफ्ट लिस्टमध्ये नसेल तर याचा अर्थ कायम स्वरुपी तुमचा मतदान करण्याचा अधिकार गेला असं नाही. तुमचं नाव तुम्ही पुन्हा या यादीत समाविष्ट करू शकता. त्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे सीईओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ड्राफ्ट रोलमध्ये जाऊन आधी आपलं नाव चेक करा. तिथे नाव नसेल तर मग तुमची हरकत किंवा दावा सादर करा.

https://voters.eci.gov.in/

हरकत दाखल करण्यासाठी फॉर्म 7 चा वापर करा

जर तुमचं नाव गायब असेल तर 30 सप्टेंबर 2026 च्या आधी फॉर्म 6 भरून आवश्यक दस्ताऐवज जमा करून तुमचा दावा सादर करा.

पत्ता बदलण्यासाठी फॉर्म 8 चा वापर करा

जर एखाद्या अपात्र व्यक्तीचं नाव चुकून ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये आलं असेल तर त्याच्या नावावर हरकत घेण्यासाठी फॉर्म 7 चा वापर करा. तसेच वोटर आयडी कार्ड म्हणजे EPIC मध्ये काही सुधारणा करायची असेल तर, जसं की नावाची स्पेलिंग, पत्ता बदलायचा असेल तर फॉर्म नंबर 8 भरा.

अशा पद्धतीने ड्राफ्ट वोटर रोल जाहीर झाल्यावर आता मतदारांना आपली हरकत किंवा दावा सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला येणार आहे. त्यामुळे त्या आधीच ही प्रक्रिया पूर्ण करा.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा