भाजप नगरसेवकाच्या मुलाने रेसच्या नादात घेतला दाम्पत्याचा बळी, मोटार सायकलला क्रेटाने दिली जबर धडक

भरधाव क्रेटा कारने बाईकला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड येथे घडली आहे. या प्रकरणात भाजपाच्या नगरसेवकाच्या मुलाची चौकशी सुरु आहे.

भाजप नगरसेवकाच्या मुलाने रेसच्या नादात घेतला दाम्पत्याचा बळी, मोटार सायकलला क्रेटाने दिली जबर धडक
car accident news- beed
| Updated on: Nov 22, 2026 | 10:07 PM

रस्त्यांवर वाहन चालवताना घडणाऱ्या अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बीड येथील माजलगाव शहरातील गढी रोडवरील सौभाग्य मंगल कार्यालयात भरधाव क्रेटा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाईकवर बसलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या क्रेटा कारला भाजपा नगरसेवकाचा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र भरधाव चालवल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून एका दाम्पत्याला जीवाला मुकावे लागले आहे.

वाहन अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच अल्पवयीन मुलाच्या हातात पालकांकडून कार देण्याचे प्रकार वाढल्याने गंभीर अपघाती मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच बीडच्या माजलगावात असाच एक अपघात घडला आहे. क्रेटा कारची चावी पालकांकडून मिळवून मित्रांसह कार रेसिंग करण्याच्या नादात एका समोरुन येणाऱ्या एका दुचाकीला या कारने उडवले. या मोटार सायकलीवरील दाम्पत्य अक्षरश: एखाद्या पोत्या प्रमाणे रस्त्यावर उडाल्याचे या सीसीटीव्ही दिसत आहेत.

Loading...

भाजपा नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप

माजलगाव शहरातील गढी रोडवरील सौभाग्य मंगल कार्यालयासमोर भरधाव क्रेटा कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हे दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली होती. या अपघातात प्रल्हादराव श्रीपतराव गायकवाड आणि सुनीता प्रल्हादराव गायकवाड या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे. माजलगाव येथील भाजपा नगरसेवक दिलीप मेंडके यांचा अल्पवयीन मुलगा हा काही तरुणांना घेऊन क्रेटा गाडी चालवत जात होता. यावेळी तरुणांची गाड्यांची रेस लागली होती. या रेसच्या नादातच हा अपघात घडल्याची चर्चा आहे. माजलगाव शहर पोलिसांकडून या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us