Sonia Gandhi Citizenship Case: नागरिकत्व मिळण्याआधीच सोनिया गांधींचे मतदार यादीत नाव; दिल्ली पोलिसांचा सर्वात मोठा खुलासा

नागरिकत्वापूर्वी नाव नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरली? असा सवाल करत  बनावट कागदपत्रांच्या आधारे सोनिया गांधी यांचे नाव नोंदवल्याचा मोठा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात 14 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. 

Sonia Gandhi Citizenship Case: नागरिकत्व मिळण्याआधीच सोनिया गांधींचे मतदार यादीत नाव; दिल्ली पोलिसांचा सर्वात मोठा खुलासा
Sonia Gandhi
Image Credit source: Sonia Gandhi
| Updated on: Nov 28, 2026 | 5:06 PM

प्रमोद जगताप, प्रतिनिधी: राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मतदार यादीतील नावावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. १९८० मध्ये सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या, मात्र १९८० च्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा महत्त्वाचा अहवाल दिल्ली पोलिसांनी दिला आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू  न्यायालयात याबाबतची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी ही मोठी माहिती दिली आहे.

सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या, मात्र मतदार यादीत नाव! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनिया गांधी भारतीय नागरिक होण्यापूर्वी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याच्या मुद्द्याबाबत दिल्ली पोलिसांनी न्यायालयात एक सद्यस्थिती अहवाल दाखल केला आहे. पोलिसांनी अहवालात म्हटले आहे की, सोनिया गांधी १९८० मध्ये भारतीय नागरिक नव्हत्या, मात्र त्यावेळी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होते. त्यांना ३० एप्रिल १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व प्राप्त केले. पोलिसांच्या मते या तथ्यांची पुष्टी जिल्हाधिकारी (डीएम) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) केली आहे.

Loading...

पोलिसांनी न्यायालयाला असेही कळवले की, अधिकारक्षेत्राचा हवाला देत या प्रकरणाशी संबंधित तक्रार आयटीओ येथील आयपी इस्टेट पोलीस ठाण्यातून तुघलक रोड पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली होती. कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार ही तक्रार दुसऱ्या पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारला. न्यायालयाने या संदर्भात पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले.

याचिकाकर्त्यांचा गंभीर सवाल! 

याबाबत जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीची पडताळणी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच  दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही याबाबत काही रेकॉर्ड मागवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी  १९८२ मध्ये मतदार यादीतून सोनिया गांधी यांचे नाव वगळले का? असा सवाल याचिकेमधून करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे  नागरिकत्वापूर्वी नाव नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरली? असा सवाल करत  बनावट कागदपत्रांच्या आधारे सोनिया गांधी यांचे नाव नोंदवल्याचा मोठा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात 14 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us