एसटीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार; कोरोना काळात घेतलेला निर्णय अखेर मागे
आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parab Decision ST candidates)

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने काही उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण खंडित करण्यात आले होती. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. (ST candidates training Stay Cancelled Anil Parab Information)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालवा या उद्देशाने 2016-17 व 2019 अंतर्गत काही उमेदवारांची निवड झाली होती.
या निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण आणि अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये 2846 पुरुष, 161 महिला, 2 पर्यवेक्षक आणि 107 अधिकाऱ्याचा समावेश होता.
सद्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी/अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते. त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.
(ST candidates training Stay Cancelled Anil Parab Information)
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीच्या आमदारांशी बोलणार; तीन दिवस मॅरेथॉन बैठका