Corona virus | वुहानमध्ये कोरोनाचे 13 प्रकार, अंदाजापेक्षा तब्बल 500 टक्क्यांनी जास्त संहारक, जाणून घ्या मोठे खुलासे

वुहानमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाचे तब्बल 13 प्रकार आढळले होते. (Corona virus origin transmission)

  • Publish Date - 8:23 pm, Mon, 15 February 21
Corona virus | वुहानमध्ये कोरोनाचे 13 प्रकार, अंदाजापेक्षा तब्बल 500 टक्क्यांनी जास्त संहारक, जाणून घ्या मोठे खुलासे
जागतिक आरोग्य संघटना आणि कोरोना विषाणू

बिजींग : कोरोना विषाणुमुळे संपूर्ण विश्व हैराण आहे. कितीही प्रयत्न केला तरी कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे शक्य होत नाहीये. कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसाराची कारणं शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या काही प्रतिनिधींनी वुहानमध्ये जाऊन तपासणी केली. कोरोनाचा अगम आणि प्रसाराचा अभ्यास करून  काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी वुहानमधून परत आले. त्यानंतर कोरोना संसर्ग आणि प्रसाराबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यानंतर कोरोना संसर्गासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत. वुहानमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाचे तब्बल 13 प्रकार आढळले होते. तसेच वुहानमध्ये कोरोना व्हायरस आढळल्यानंतर या व्हायरसने अंदाजापेक्षा तब्बल 500 टकक्यांपेक्षा जास्त विध्वंस झाला, अशी माहिती समोर येत आहे. (Corona virus origin and its transmission secret reaveld)

डिसेंबरमध्ये कोरोनाचे  प्रसार

कोरोनाचा प्रसार आणि उगम चीमधील वुहान येथून झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिसर्चर पिटर इमरबॅक यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार वुहान शहरात कोरोनाचा प्रसार डिसेंबरमध्ये सुरु झाला. पिटर यांनी कोरोनाच्या जनेकिटक्स बद्दलही अभ्यास केला. पिटर यांनी सांगितल्याप्रमाणे वुहान येथे डिसेंबरमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसचे तब्बल 13 वेगवेगळे जनेटिक सिक्वेन्स दिसून आले. म्हणजेच चीनमध्ये डिसेंबमध्येच कोरोनाचे वेगवेगळे 13 प्रकार समोर आले होते. तसेच, यूनिवर्सिटी ऑफ सिडनीचे व्हायरॉलॉजिस्ट ए‌ॅडवर्ड होम्स यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचे तब्बल 100 रुग्ण आढळले होते.

इटलीमध्ये कोरोनाचा उगम?

दरम्यान, कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याचे सर्व दावे चीनने फेटाळलेले आहेत. तसेच मिलान कॅन्सर इन्टिट्यूटने सांगितल्याप्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रसार 2019 मधील
ऑक्टोबर महिन्यातच सुरु झाला होता. ऑक्टोबर महिन्यात इटलीमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळून आल्याचा अंदाज या इन्सिट्यूटने व्यक्त केला आहे. असे असले तरी चीनच्या सरकारी कागदपत्रांनुसार चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 17 नोव्हेंबर 2019 आढळला होता.

 


इतर बातम्या :

कोरोना ऑस्ट्रेलियन बीफमधून प्रसारित जागतिक आरोग्य संघटनेच्या चीनमध्ये गेलेल्या टीमचं मत, अमेरिकेचा नेता म्हणतो…..

Corona Virus | सावधान! लसीच्या नावावर ‘मिठाचं पाणी’ विक्रीला, Fake Vaccine चा पर्दाफाश

सावधान ! आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु

(Corona virus origin and its transmission secret reaveld)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI