AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | सावधान! लसीच्या नावावर ‘मिठाचं पाणी’ विक्रीला, Fake Vaccine चा पर्दाफाश

लोकांच्या भीतीचा फायदा उचलत हा गट लशीच्या नावावर इन्जेक्शनमध्ये मिठाचं पाणी भरुन विकत आहेत.

Corona Virus | सावधान! लसीच्या नावावर 'मिठाचं पाणी' विक्रीला, Fake Vaccine चा पर्दाफाश
| Updated on: Feb 02, 2021 | 1:38 PM
Share

बिजिंग : जगाला आतापर्यंतचा सर्वात घातक आजार कोरोना (Coronavirus) देणाऱ्या चीनमधून (China) पुन्हा एकदा (Fake Vaccine gang busted in China) घाबरवणारी बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक गट गेल्या काही महिन्यांपासून बनावटी लस बनवत आहेत. लोकांच्या भीतीचा फायदा उचलत हा गट लशीच्या नावावर इन्जेक्शनमध्ये मिठाचं पाणी भरुन विकत आहेत. चीनच्या सरकारी मीडियाने, याबाबतची माहिती दिली की ही गँग गेल्या सप्टेंबरपासून बनावट लस बनवत आहेत (Fake Vaccine gang busted in China).

चीनमध्ये सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनुसार, अनेक शहरांमध्ये हा धंदा चालवण्यात येत आहे. पोलिसांनी जियांगसू, बिजिंग आणि शानडोंगमध्ये 80 पेक्षा अधिक लोकांना या प्रकरणी अटक केली आहे. या लोकांनी आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त बनावटी लस बनवल्या आहेत. शिन्हुआने सांगितलं की, चीनचं पब्लिक सिक्योरिटी मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे. बनावट लस बनवणे आणि त्याला विकणे हे प्रकरण सरकारने गंभीरतेने घेतलं आहे (Fake Vaccine gang busted in China).

मिठाच्या पाण्याने कमावले लाखो रुपये

पोलिसांनी तपासात माहिती मिळाली की गेल्या वर्षी सप्टेंबरपासून हे लोक बनावट लस विकत आहेत. बाजारात मिठाचं पाणी भरलेले इन्जेक्शन (saline solution) विकून यांनी बक्कळ पैसा कमावला. कोरोना लशीच्या नावावर या गँगने मोठ्या प्रमाणात बनावट लस विकली आणि पैसा कमावला.

चीनमध्ये बनवलेली कोरोना लसही असरदार नाही

कोरोना विषाणूसाठी चीनने दोन लस तयार केल्या. यांना सिनोवॅक आणि सिनोफार्म (Sinovac and Sinopharm) कंपन्यांनी तयार केलं आहे. ही लस चीनशिवाय तुर्कीसह अनेक देशांमध्ये पाठवण्यात आलं आहे. दोन्ही कंपन्यांनी सुरुवातीला दावा केला होता की त्यांची लस कोरोनाशी लढण्यात 78 टक्के असरदार आहे. पण, नंतर ब्राझिलमध्ये झालेल्या ट्रायलमध्ये सिनोवॅक फक्त 50.38 टक्के असरदार ठरली. त्यानंतर अनेक दिवसांनी लशीच्या ऑर्डरची समिक्षा करण्यास सुरुवात केली. चीनच्या सरकारी कंपन्याद्वारे बनलेल्या सिनोफार्म लशीला ट्रायलदरम्यान 79.34 टक्के असरदार मानलं गेलं.

Fake Vaccine gang busted in China

संबंधित बातम्या :

चीनची कोरोना लस घेणाऱ्या देशांची चिंता वाढली, सीरमच्या Covishield लसीला ब्राझील, इंडोनेशियाची पसंती

चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला

आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.