सावधान ! आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु

सावधान ! आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु

चीनने युद्धपातळीवर प्रयत्न करुन चीनमध्ये कोरोनावर नियंत्रणही आणलं, मात्र, सध्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 17, 2021 | 8:42 PM

मुंबई : चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात कहर केला. यानंतर चीनने युद्धपातळीवर प्रयत्न करुन चीनमध्ये कोरोनावर नियंत्रणही आणलं, मात्र, सध्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय. त्यामुळे चीनच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. त्यातच चीनमध्ये एक नवा प्रकार समोर आलाय. यामुळे जगभरातील तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. चीनच्या पूर्व भागात आईस्क्रीममध्येच कोरोना विषाणू आढळला आहे (Coronavirus in Ice cream). यानंतर या बॅचमध्ये तयार झालेले सर्व आईस्क्रीम डब्बे परत मागवण्यात आलेत (Corona Virus news COVID virus found in Ice cream in China).

बीजिंगजवळील तियानजिन शहरात हा प्रकार घडला. ही गोष्ट लक्षात येताच तेथील स्थानिक प्रशासनाने शहरातील दाकियाओदाओ या फूड कंपनीला सील केलंय. याशिवाय या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी देखील केली जात आहे. मात्र, आईस्क्रीममधून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

390 डब्यांचा शोध सुरु

चीन सरकारने या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं, “कंपनीच्या या बॅचच्या 29,000 डब्यांपैकी अधिकाधिक डबे विकले गेलेले नाहीत. त्यातील केवळ 390 डब्यांचीच तियानजिनमध्ये विक्री झाली. या आइस्क्रीममध्ये न्यूझीलंडमधील दूध पावडर आणि यूक्रेनची ताक पावडर वापरण्यात आली होती.”

आईस्क्रीममधी कोरोना विषाणूचं खापर चीनकडून इतर देशांवर

चीनने म्हटलं, “हा आजार इतर देशांमधून आमच्याकडे आला. आयात केलेले मासे आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये कोरोना विषाणू सापडला.” असं असलं तरी आंतरराष्ट्रीय संशोधकांना यावर संशय आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण वुहानमध्ये 2019 मध्ये सापडला होता.

हेही वाचा :

China | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार

धक्कादायक! ‘त्या’ कालावधीत इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्याच नाहीत

भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Corona Virus news COVID virus found in Ice cream in China

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें