AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार

तब्बल आठ महिन्यांनंतर चीनमध्ये कोरोनामुळे कुठल्या मृत्यू झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात या विषाणूमुळे चीनमध्ये शेवटचा मृत्यू झाला होता.

China | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार
| Updated on: Jan 14, 2021 | 11:53 AM
Share

शांघाई : चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणू फोफावतोय (First Death Due To Corona Virus In Eight Months). तब्बल आठ महिन्यांनंतर चीनमध्ये कोरोनामुळे कुठल्या मृत्यू झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात या विषाणूमुळे चीनमध्ये शेवटचा मृत्यू झाला होता. यादरम्यान, जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) विशेषज्ज्ञांची टीम तातडीने वुहानचा दौरा करु शकते. याच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे (First Death Due To Corona Virus In Eight Months).

चीनच्या हॅबेमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या प्रदेशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तसेच, लॉकडाऊनचीही सक्ती करण्यात आली आहे. या प्रदेशात कोरोनामुळे आठ महिन्यांनंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, इथे 138 नीवन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या गेल्या मार्चनंतरची सर्वाधिक संख्या आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चीन सरकारने अभियानाला सुरुवात केली आहे. हॅबेची राजधानी शीजीयाजूआंगमध्ये परिवहन, शाळा आणि दुकानं बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच शेजारील प्रदेश जिंगताईमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. येथील लँगलांग शहरात तब्बल पाच कोटी लोक राहतात. हे सर्व गेल्या शुक्रवारपासून घरात बंद आहेत.

यादरम्यान, उत्तर-पूर्व हेईलोंगजियांगमध्ये बुधवारी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ नये. खूप आवश्यक असेल तेव्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच ते प्रवास करु शकतील, असे आदेश देण्यात आले आहेत. चीनमध्ये गेल्या मे महिन्यापासून कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. पण, तब्बल आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या चीन अलर्ट झाला आहे.

First Death Due To Corona Virus In Eight Months

संबंधित बातम्या :

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

वटवाघूळ-उंदीर खाणाऱ्या चीनचा कानाला खडा; कोरोनाच्या भीतीने शाकाहाराकडे वाटचाल?

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.