ST Strike Photo: संपाची धार तीव्र; उत्तर महाराष्ट्राची कोंडी!

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे नाशिक, जळगावसह बहुतांश ठिकाणी बस वाहतूक ठप्प आहे.

| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 1:33 PM
1 / 6
ST Strike सटाणाः एसटीच्या आंदोलनामुळे सटाणा येथीस बस स्ट्ँडवर शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रवाशांनी आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा खासगी वाहनांनी प्रवास करण्यास भर दिल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचे हाल झाले.

2 / 6
ST Strike धुळेः एसटीच्या संपाला धुळ्यामध्येही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. आगारात साऱ्या बस थांबल्या आहेत. कर्मचारी आक्रमक झाले असून, राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा संप अजून चिघळेल असा इशारा दिला आहे.

3 / 6
ST Strike रावेरः राज्यव्यापी संपात रावेर आगारातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बस फेऱ्या रद्द आहेत. साऱ्या बस एकाच ठिकाणी लावल्या आहेत. नागरिक हा संप कधी थांबेल याचीच वाट पहात आहेत.

4 / 6
ST Strike जळगावः उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आगारात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे बस जागेवर उभ्या आहेत. प्रवाशांनीही स्टँडकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या परिसरात भयाण शांतता अनुभवायला येत आहे.

5 / 6
ST Strike आगार क्रमांकः नाशिक आगार क्रमांक एक येथील एसटी कर्मचारीही संपात सहभागी झाली आहेत. त्यांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू करत या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

6 / 6
ST Strike नाशिक: एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नाशिक जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड हाल होत आहेत. नाशिक मध्यवर्ती बसस्थानकात अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.