AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य सरकारची मंजुरी, सुरक्षित प्रवासासह बेरोजगारांना रोजगाराची संधी

अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅनची संकल्पना आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य सरकारची मंजुरी, सुरक्षित प्रवासासह बेरोजगारांना रोजगाराची संधी
school van policy
| Updated on: Aug 11, 2025 | 4:06 PM
Share

मुंबई : स्कूलबसचे भाडेदर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी नाईलाजाने अनधिकृत रिक्षांचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. ही वाहने BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य सरकारने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असुन या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले .

स्कूल बसचे भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षांचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य देतानाच सुरक्षित वाहतूकीसोबत बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅन धोरणाला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या धोरणानुसार स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन चालू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे,असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

स्कूल व्हॅनची वैशिष्ट्ये

– जीपीएस यंत्रणेने सुसज्ज

– सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन

– अग्निशमन अलार्म प्रणाली

– दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा

– ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर

– पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे

– स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

– गाडीच्या छतावर शाळेचे नाव

Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.