AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला रोहिणी खडसेंची सहानुभूती…रूपाली चाकणकर यांचे प्रांजल खेवलकरवर गंभीर आरोप तर दुसरीकडे….

पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी सुरू असताना प्रांजल खेवलकर याला अटक केली. खेवलकर हा एकनाथ खडसे यांचा जावई तर रोहिणी खडसेचा पती आहे. आता खेवलकरबद्दल धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. रूपाली चाकणकर यांनी केलेल्य दाव्यानंतर तर मोठी खळबळ उडाली आहे.

मला रोहिणी खडसेंची सहानुभूती...रूपाली चाकणकर यांचे प्रांजल खेवलकरवर गंभीर आरोप तर दुसरीकडे....
Rupali Chakankar and Rohini Khadse
| Updated on: Aug 08, 2025 | 1:06 PM
Share

पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला अटक केली. धक्कादायक म्हणजे या पार्टीमध्ये फक्त पुरूषच नव्हते तर काही महिलांचा देखील समावेश होता. या पार्टीतील सर्व आरोपी सध्या कोठडीत आहेत. जावयाच्या अटकेनंतर खडसे कुटुंबियांकडून वेगळाच दावा केला जातोय. दुसरीकडे या वादात महिला आयोगाने उडी घेतली असून त्यांनी पार्टी प्रकरणातील संपूर्ण अहवाल पोलिसांकडून मागवून घेतला. पत्रकार परिषद घेत त्यांनी खुलासे देखील केले.

रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की, काही गोष्टी मी बोलू शकत नाही, मला संकोच वाटतो बोलताना तपास देखील सुरू आहे. प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये मुलींच्या चॅटचे काही स्क्रीनशॉर्ट आहेत जे धक्कादायक आहेत. मुलींचे नग्न फोटो व्हिडीओ यासोबतच काही व्हिडीओंमध्ये खेवलकर हा स्वत: दिसतोय. मुलींना नशा करायला लावून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आली.

यादरम्यान बोलताना रूपाली चाकणकर यांनी थेट म्हटले की, या सर्व प्रकारानंतर मला रोहिणी खडसे यांची सहानुभूती वाटते…यामधील सर्व गोष्टी त्यांना माहिती झाल्यावर त्यांच्या मनातील बरेचसे गैरसमज दूर होतील आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांना जर याबद्दल सर्व माहिती असेल आणि त्याचे समर्थन त्या करत असतील तर गुन्हाचे समर्थन करणारही गुन्हेगार असतो. तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे.

दोघीही एकमेकींवर जोरदार टीका करताना कायमच दिसतात. रूपाली चाकणकर यांनी पतीच्या रेव्ह पार्टीवरून मध्यंतरी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली होती, त्याबद्दल बोलताना खडसे यांनी म्हटले होते की, योग्य वेळ आल्यावर मी सर्वांच्या टिकेला उत्तर देणार आहे. रोहिणी खडसे या पतीसाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. सुनावणीच्या दिवशी त्या कोर्टात पोहोचल्या होत्या. प्रांजल खेवलकरला फसवण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी सुरूवातीला म्हटले होते. रोहिणी खडसे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांनी देखील एक पोस्ट शेअर केली होती.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक