AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार

शिर्डीतील साई मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांना विविध आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिर्डीतील भक्तांना या कुत्र्यांना त्यांच्याकडील अन्न पदार्थ आणि फास्ट फूड खायला देऊ नये असे आवाहन केले आहे.

माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार
| Updated on: Mar 23, 2025 | 4:08 PM
Share

शिर्डीत साईनगरीत आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतो. साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुत्र्यांना डायबिटीजचा आजार झाला असल्याचे उघडकीस आलेले आहे.त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नका असे आवाहन भक्तांना करण्यात आले आहे.

शिर्डीतील साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे साईभक्तांची मोठी गर्दी होत असतानाही हे कुत्रे रस्त्यावर ठिकठिकाणी सुस्तपणे पडून असतात.त्यामुळे यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता या कुत्र्यांना चक्क डायबिटीज झाल्याचे उघडकीस आले आहे. साई मंदिरात आलेले भक्तमंडळी या कुत्र्यांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्कीट खायला देत असतात. मात्र, हा आहाराच कुत्र्यांच्या जीवावर बेतत आहे.

मधुमेहासह जडल्या विविध व्याधी

सतत गोड पदार्थांच्या सेवनाने साई मंदिर परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांना मधुमेह, सुस्ती, केसगळती आणि लठ्ठपणा अशा व्याधी जडल्याचे समोर आले आहे. साई मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील श्वान लठ्ठ झाले आहेत. त्यांचे वजन वाढल्याने हे श्वान कायम एका ठिकाणी सुस्तपणे पहुडल्याचे चित्र दिसत असते. याउलट दोन किलोमीटर परिघाबाहेरील श्वान मात्र तरतरीत असल्याचे उघड झाले आहे.  हा विरोधाभास टळकपणे नरजेस आला आहे.  मात्र सहज अन्न उपलब्ध होत असल्याने साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. साईभक्त किंवा शिर्डी ग्रामस्थांनी कुत्र्यांना गोडधोड खाऊ घालू नये असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी सुशील कोळपे यांनी केले आहे.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू