Bhandara Hospital Fire : कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कारवाई होणारच, राजेश टोपे आक्रमक

| Updated on: Feb 10, 2021 | 1:20 PM

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. (Bhandara hospital fire Rajesh Tope)

Bhandara Hospital Fire : कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कारवाई होणारच, राजेश टोपे आक्रमक
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कोठर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी रोखठोक भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (strict action will be taken against the culprits of Bhandara hospital fire incident said Rajesh Tope)

9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. विरोधकांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत दोषींवर कडक करावाई करण्याची मागणी केली होती. विरोधकांच्या या मागणीनंतर सरकारने वेळोवेळी आपली भूमिका मांडून दोषींवर कडक करावाई केली जाईल, असं सांगितलेलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा रिपोर्ट आला नाही

भंडारा रुग्णालय दुर्घटनेबद्दल बोलताना टोपे यांनी सीसीटीव्ही फुटेजचा रिपोर्ट आला नसल्याचे सांगितले. तसेच, हा रिपोर्ट यायला दोन दिवसाचा वेळ लागणार असून प्राथमिक माहितीनुसार कर्तव्यावर असलेल्या दोन नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. घटना घडली तेव्हा घटनास्थळी या दोन्ही नर्सेस उपस्थित नव्हत्या. या दोन्ही नर्सेसने आपल्या कामात निष्काळजीपणा केला. हा प्रकार गंभीर असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

7 जणांवर कारवाई, 6 जणांचं निलंबन

रुग्णालयातील रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं येथे आग लागली होती. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही आग लागली. रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली. 2015 मध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती 21 जानेवारी रोजी टोपे यांनी दिली होती.

दरम्यान, या घटनेबाबत दोषींवर कारवाई करण्यासाठी FIR दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतर याबाबत करावाई केली जाईल. असे टोपे म्हणाले.

इतर बातम्या :

Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

…आणि भंडाऱ्याच्या त्या राखेतही दोनशे जिवांची किलबिल! काय घडलं 14 दिवसात?

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

(strict action will be taken against the culprits of Bhandara hospital fire incident said Rajesh Tope)