मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा

हेमंत बिर्जे

हेमंत बिर्जे | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 3:35 PM

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.

मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा
परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी (Students) घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

सुरूवातील विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण परिसराचा चार्ज घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजपाटा बोलवला.

या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचं, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असा धंदा सरकारकडून सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप हे सरकार करतंय अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही दरेकर म्हणाले आहे. परीक्षांच्या संदर्भात ज्या संस्थाची निवड केली त्या संस्थाचे काम बघा असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा करायच्या अशी कोपरखिळी सुधीर मुनगंटीवर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र हे कुणाच्या नावावर असणारे राज्य नाही, खोट्या बहुमताच्या आधारे हे सरकार आलं आहे, आता तरी सरकारने डोकं ठिकाणावर आणावे, अशी टीका भाजपने केली आहे.

HSC-SSC Exam | दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात, औरंगाबाद नांदेडसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचीही मागणी

Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर

Zodiac | होऊ दे खर्च!, छप्परफाड धन आणि संपत्ती , या 4 राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI