चिमणीला पाणी नव्हतं, तिथे धबधबा कोसळू लागला, पानी फाऊंडेशनने करुन दाखवलं!

उन्हाळ्यात वॉटर कप स्पर्धेसाठी साऱ्या गावानं एकजुटीने डोंगरावर जलसंधारणाची कामे केली. ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात बघायला सुध्दा पाणी मिळत नव्हते. त्या डोंगरावरुन धो धो पाणी पडू लागले आहे.

चिमणीला पाणी नव्हतं, तिथे धबधबा कोसळू लागला, पानी फाऊंडेशनने करुन दाखवलं!
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 4:35 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गेले दोन दिवस पाऊस सुरु आहे. या पावसामुळे येथील जलसाठे भरत आहेत. ज्याप्रमाणे राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने धबधबे ओसंडून वाहत आहेहेत, अगदी त्याचप्रमाणे, यावर्षी चक्क दुष्काळी सावर्डे गावात धबधबा वाहू लागला आहे. उन्हाळ्यात पानी फाऊंडेशनच्या (Paani Foundation) माध्यमातून, वॉटर कप स्पर्धेसाठी साऱ्या गावानं एकजुटीने डोंगरावर जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे पावसाळ्यात डोंगर हिरवाईने नटला आणि गावात धबधबे वाहू लागले आहेत.

उन्हाळ्यात वॉटर कप स्पर्धेसाठी साऱ्या गावानं एकजुटीने डोंगरावर जलसंधारणाची कामे केली. ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात बघायला सुध्दा पाणी मिळत नव्हते. त्या डोंगरावरुन धो धो पाणी पडू लागले आहे. या ठिकाणचा हा धबधबा पाहण्यासाठी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पर्यटक सावर्डेच्या डोंगरावर येऊ लागले आहेत. गावातील ग्रामस्थांसाठी तसंच पर्यटकांसाठी हा धबधबा म्हणजे एक पर्वणी ठरत आहे.

तासगाव तालुक्याला कायम पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे. याच दुष्काळाला यावर्षी हरवण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या मदतीनं साऱ्या गावानं डोंगरावर जलसंधारणाची काम केली. वरुणराजाने त्यांच्या प्रामाणिक कष्टाला धो..धो पडून सलाम केला. आणि 4 दिवसांपूर्वी ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात चिमणीला प्यायला पाणी न्हवतं तिथं पाणीच पाणी जमा झालं. त्या पाण्यात चिमण्या पाखरांनी अंघोळ केली. डोंगरातली जनावरं पाणी प्यायला आली. भर उन्हाने करपलेली धरणीमाता थंड झाली.

सावर्डे गावातील सौंदती देवालयाजवळील डोंगरावर हा धबधबा सुरू झाला आहे. ” लई दिसांनी भरल्यावानी  शिवार झालंया’ याचीच अनुभूती सावर्डेच्या लोकांना पाणी बघून आली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.