सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा

या भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. (Sudhir Mungantiwar Relatives died in car accident)

सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा
सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात
| Updated on: Feb 25, 2021 | 12:18 AM

बीड : भरधाव वेगात असलेली चारचाकी पुलाच्या खाली गेल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील तिंतरवणी या ठिकाणी घडली. अपघातात मृत झालेले दोघेही व्यक्ती हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. (Sudhir Mungantiwar Relatives died in car accident)

मिळालेल्या माहितीनुसार, तिंतरवणी- कल्याण विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील मातोरी- तिंतरवणीजवळ भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार असे या मृत व्यक्तींची नाव आहे.

सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील तिंतरवणी-मातोरीच्या दरम्यान ममता आणि विलास हे दोघेही पुसद स्वत:च्या खासगी वाहनाने पुण्याकडे निघाले होते. पुण्यात त्यांचा मुलगा राहतो. त्याला भेटण्यासाठी ते खासगी वाहनाने पुण्यात जात होते. मात्र मातोरी-तिंतरवणी दरम्यान त्यांची MH 29 R 4230 या क्रमांकाची चारचाकी गाडी पुलावरुन कोसळली. यामुळे भीषण अपघात घडला.

सुधीर मुनगंटीवारांच्या नातेवाईकाच्या कारला भीषण अपघात

या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दरम्यान या अपघातानंतर स्थानिक पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Sudhir Mungantiwar Relatives died in car accident)

संबंधित बातम्या : 

आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या

जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, सातारा पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, गांजाप्रकरणातील परदेशींचा राडा