सुनेत्रा पवार पालकमंत्री असलेल्या पुण्याचे CM फडणवीसांनी पालकत्व घ्यावे, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

Pune News : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. 'मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत, राजकारण करायचं नाही,' असं म्हणत त्यांनी पुण्याची जबाबदारी फडणवीसांनी घ्यावी, अशी मागणी केली. या मागणीमागे नेमकं कारण काय?

सुनेत्रा पवार पालकमंत्री असलेल्या पुण्याचे CM फडणवीसांनी पालकत्व घ्यावे, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Supriya Sule Latest News
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 7:59 PM

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरुन चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, गेल्या दोन वर्षात पुणे शहरात प्रचंड प्रमाणात क्राइम वाढले आहे. मुख्यमंत्र्यांना नेहमी सांगत आले आहे मी, देशात ५ नंबर आणि महाराष्ट्रात १ नंबरला क्राईम मध्ये पुणे शहर आहे. मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत माल टीका करायची नाही, राजकारण करायचे नाही. अशा घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी. इन्फो टेक पार्क आहे ६ लाख लोक काम करतात. सीएमना  विनंती आहे की, आपण पुण्याची जबाबदारी घ्यावी. पुण्याचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे, असं सुळेंनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुण्याच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते.

Loading...

गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे, असंही सुप्रिया सुळेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत म्हणाल्या…

पत्रकारांशी संवाद साधताना सुळेंनी सांगितलं की, रोहित पवार यांचे कुठे आंदोलन आहे माहीत नाही. आमची उद्या मिटिंग आहे, आंदोलनाबद्दल माहीत नाही, शशिकांत शिंदेंना विचारते. मी अध्यक्ष नाही शशिकांत शिंदेंना विचारा. पक्षाची भूमिका शशिकांत शिंदे यांना विचारा ते भूमिका ठरवतात. पार्टी सांगेल ते मी करत असते, असंही यावेळी सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us