‘घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण 18 वर्ष…’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले?

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची सभा या निमित्ताने आयोजित करण्यात आली.

'घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण 18 वर्ष...', सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले?
खासदार सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 6:02 PM

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महाविकास आघाडीची आज मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. “कौतुक वाटतं टीकेचं. घटस्फोट होऊन सहा महिने झाले. मात्र 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहेत”, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. “हे इलेक्शन आमच्या हातात नाही तर जनतेच्या हातात आहे. लोक बोलतात धमकी येते. पण धमकी येत असेल मला फोन करा”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

“घरातला मोठा माणूस असेल तर दोन पावले मागे राहून काय ते काम करावं. यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला मविआ एकत्र लढणार आहे. त्यांनी कितीही खालच्या पातळीवर भाषणे केली तरी आम्ही आमची भाषणांची उंची वाढवत राहणार. माझी लढाई त्या अदृश्य शक्तीसोबत आहे. शिरूर मतदारसंघात फॉक्सॉन प्रकल्प इन्वेस्टमेंट येणार होती. 2 लाख रोजगार येणार होते. मात्र त्या 2 लाख नोकऱ्या घालवायचं कोणी काम केलं असेल तर आता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले?

“मला सहकार्य आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. अमोल कोल्हे आणि माझ्यावर अनेक वेळा टीका होतेय. ही निवडणूक महाराष्ट्रातील जनतेने हातात घेतलीय. जो कुणाला धमकीचा फोन येतो त्यांनी माझा नंबर द्या. आम्ही डंके की चोट पे संसदेत प्रश्न विचारू. आजपर्यंत स्थानिक निवडणूकमध्ये लक्ष घातलं नाही. कारण वडीलधारी मंडळी काम करत होते. लोकसभा नंतर ग्रामपंचायतपर्यंतच्या सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. माझ्या कामाचा जाहीरनामा वाचल्यानंतर मतदार मला मतदान करतील. माझी लढाई ही अदृश्य शक्तीविरोधात आहे. आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आहोत. यावेळी चिन्ह बदललं पण आम्ही पक्ष चोरला नाही तरी आमचं चिन्ह चोरल गेलं. शारदाबाई पवार यांची मी नात आहे. माझ्या आजीने रडायला नाही लढाईला शिकविले”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीदेखील भाषण केलं. “आजचा दिवस उमेदवारीचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. त्यामुळे तुम्ही नक्कीच जोमाने काम करणार आहात. 10 वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी फसवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळेस पेट्रोल 71 रुपये लिटर होते. आज 3650 दिवस झाले. 50 टक्के पेट्रोल दर कमी करायचे होते. पण आज पेट्रोल 105 रुपये आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ही बाब सत्ताधारी लोकांनी दाखवून दिली. सत्ता असेल तर ती लोकांच्या भल्यासाठी हवी, लोकशाही जगवण्यासाठी हवी. लोकशाही वाचविण्यासाठी तयार राहा”, असं शरद पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.