पहिलाच दणका…, खोक्या भाईच्या मुसक्या आवळताच सुरेश धस काय म्हणाले?

मोठी बातमी समोर आली आहे, आज अखेर पोलिसांनी खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याच्या मुसक्या आवळल्या आहेत. खोक्या भोसले याला अटक केल्यानंतर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पहिलाच दणका..., खोक्या भाईच्या मुसक्या आवळताच सुरेश धस काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 4:31 PM

आज अखेर खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथून खोक्या भाईच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर आले आहेत. तो आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान खोक्या भोसले याला अटक केल्यानंतर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अटक करून पोलिसांनी सतीश भोसले याला आज पहिला दणका दिला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

खोक्या उर्फ सतीश भोसले याला आज प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. मात्र तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरेश धस यांना देखील सहआरोपी करावं अशी मागणी होत आहे, याबाबत त्यांना विचारलं असता ते चांगलेच चिडले, ‘ सहआरोपी करायला तो काय भाजीपाला आहे का? असे कसेही सहआरोपी होतात का?’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले खोक्याला अटक झाली, ही चांगली गोष्ट आहे. तो चुकला तो आरोपी आहे, त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. या प्रकरणात मी हस्तक्षेप करणार नाही. मात्र सहआरोपी करायला तो काय भाजीपाला आहे का?  असे कसेही सहआरोपी होतात का?’ असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

कोण आहे खोक्या? 

खोक्या उर्फ सतीश भोसले हा काही काळ भाजपचा पदाधिकारी देखील होता. त्याने आपली जात खोटी सांगून पक्षात मत मिळवलं, मात्र हे लक्षात आल्यानंतर त्याची हाकालपट्टी करण्यात आली अशी या संदर्भातील आपली भूमिका भाजपनं स्पष्ट केली आहे. दुसरीकडे खोक्या हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची देखील चर्चा आहे. आतापर्यंत खोक्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याने आतापर्यंत तब्बल दोनशे हरणाची शिकार केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच त्याचा पैसे उधळत असतानाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.