Suresh Dhas : खोक्याला अटक; सहआरोपी करण्याच्या मुद्यावर धस चिडले
Suresh Dhas On Satish Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याला आज अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. त्यावर धस मात्र चांगलेच चिडलेले बघायला मिळाले आहेत.
सहआरोपी करायला भाजीपाला आहे का? कसेपण सहआरोपी होतात का? असा उलट सवाल आमदार सुरेश धस यांनी आज माध्यमांसमोर बोलताना केला आहे. बीड जिल्ह्यात मारहाण प्रकरणात चर्चेत आलेल्या सतीश भोसले याला आज पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक केली आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश उर्फ खोक्या याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. त्यानंतर आता सतीश भोसलेच्या प्रकरणात सुरेश धस यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर विधिमंडळाच्या आवारात सुरेश धस यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना धस म्हणाले की, भोसलेला अटक झाली ही चांगली गोष्ट आहे. तो चुकला, त्याला शिक्षा व्हायला हवी. मी यात हस्तक्षेप करणार नाही. सहआरोपी करण्याची मागणी होत असल्याच्या माध्यमांच्या प्रश्नावर मात्र धस वैतागलेले दिसले. आका, खोका अन सहआरोपी करा हे जे सुरू आहे, तर सहआरोपी करायला काय भाजीपाला आहे का? कोणालाही सहआरोपी करता येतं का? असा उलट प्रश्नच धस यांनी विचारला.
Published on: Mar 12, 2025 03:10 PM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
