मुंबईतील बड्या बिल्डरविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

अनेक कार्यालयांमध्ये मराठी माणसं काम करतात. पण कार्यालयात मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक वाद निर्माण होतात. आता देखील असंच काही झालं आहे. यामुळे मुंबईतील बड्या बिल्डरविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

मुंबईतील बड्या बिल्डरविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Sushil Raheja
| Updated on: Feb 04, 2026 | 12:54 PM

मुंबई मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुशील रहेजा यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. आता हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. या प्रकरणी सुशील रहेजा यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील पोलीस कारवाई सुरू आहे. तक्रारदार तरुण चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवर असलेल्या रहेजा होम्सच्या मुख्य कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि बैठकीला उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी मला सुशील रहेजा यांच्याकडून कार्यालयात मारहाण झाली. गेल्या 15 वर्षापासून मी त्यांच्याकडे कामाला आहे. गेल्या काही वर्षापासून ते मला आणि आमच्या कार्यालयात काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना ते हिणवून बोलतात. 18 तारखेला तर माझ्याकडून फाईलला स्टेपल करण्याच्या संदर्भात चूक झाली तर त्यांनी मला मागून येऊन जोरदार कानाखाली मारली…

एवढंच नाही तर, तुम्ही घाटी साले जयभीम वाले… बोलत पुढे शिवीगाळ करायला सुरवात केली. घडलेल्या प्रकरणानंतर मी ऑफिसच्या खाली जाऊन थांबलो होतो पुन्हा मला वर जाण्याची हिंमत नव्हती. ते (सुशील रहेजा) पुन्हा मला मारतील अशी भीती माझ्या मनात होती, म्हणून मी शांत बसलो. मी घरी पोहोचलो, तेव्हा देखील माझी मानसिक स्थिती स्थिर नव्हती… त्यामुळे स्वतःला संपवण्यापर्यंत विचार माझ्या डोक्यात सुरु होते.

पुढे राहुल जाधव म्हणाले, ‘कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसमोर मला खूप हिणवलं होतं. त्यामुळे 8 दिवस मी घराच्या बाहेर देखील पडलो नाही. अशात आमच्या परिसरात राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मला धीर दिला आणि झालेल्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी मला पाठबळ दिलं… त्यामुळे रहेजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला शिक्षा मिळावी आणि मला न्याय मिळावा अशी पोलिसांकडून आणि न्यायदेवतेकडून अपेक्षा आहे.’ असं देखील राहुल जाधव आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us