
भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “गृहमंत्र्यांकडून काही अपेक्षा आहेत. या सगळ्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. यावर स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या. माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही. माझा ट्रस्टपुरता संबंध होता. मला त्याच्या व्यक्तिगत आयुष्याची काही माहिती नाही. खबरदार पुढारीचा जो उपसंपाद होता दत्तात्रय खेमनार. त्याला जी काही महिला आयोगाच्या पदासह पत्र पाठवली होती. पोलिसांना गुन्हे दाखल करा असा आदेश दिला होता. चाकणकरांनी दबाव आणला होता. याचे पुरावे समोर आले आहेत” असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
“चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या. ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे. तंत्र-मंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे. हे तंत्र-मंत्र काळी जादू या सगळ्या अंधश्रद्धा निर्मलून कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत. जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही. माझे यजमानच माझी पूजा करतात. मी किती सुधारणावादी विचाराची आहे असं सागंणाऱ्या आयोगाच्या अध्यक्ष फक्त त्यांच्या पदराने पाय पुसत होत्या. पायाशी अक्षर लोळण घेतात” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या
“या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या पीडित महिलांनी सांगितलं की, खरातांचे वडिल वारले तेव्हा चाकणकर होत्या. खरातांच्या पोरीच लग्न जमलं तेव्हा चाकणकर पुढे होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरात राहते. खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शिअल डॉक्युमेंट ते ही दोन दिवसात पुढे आणेन. यात गंभीर गोष्ट कळली ती म्हणजे एका पीडितने सांगितलं की, चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या” असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
काही फोटो दाखवले
सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटो दाखवले. “हा फोटो फक्त ट्रस्टवरच्या संचालकाचा फोटो आहे का? या फोटोंवरुन खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत या तेच सांगतील” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
तीन मागण्या काय?
“ज्या बाई राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापून अशा पद्धतीने तंत्र-मंत्र करतात असं पीडित महिला सांगतात. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान चाकणकर यांच्या हातावर जखम होती. हे गंभीर आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “रुपाली चाकणकर यांना त्या पदावरुन हटवण्यात यावं. चाकणकर आणि खरात यांना समोरासमोर बसवून चौकशी करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा” अशी तीन प्रमुख मागण्या सुषमा अंधारे यांनी केल्या. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासले पाहिजेत. त्यांचं किती वेळा, कोणत्या वेळी बोलणं झालं हे समजलं पाहिजे” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.