AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली… राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बोचरा वार

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त गुरु अशोक खरात यांच्या व्हायरल फोटोंवरून अमोल कोल्हे यांनी कवितेच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे.

Rupali Chakankar : सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली... राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बोचरा वार
Rupali Chakankar
| Updated on: Mar 20, 2026 | 10:48 AM
Share

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्यातील कथित संबंधांवरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. अशोक खरात यांच्या पाया पडतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे. कोल्हे यांनी थेट कवितेचा आधार घेत चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणे हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला

जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!

त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली

सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.

काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली

सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली,

गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात नावाच्या व्यक्तीचे काही व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये ते स्वतःला दैवी शक्ती असलेले गुरु मानत असल्याचे दिसून येते. याच खरात यांच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना रुपाली चाकणकर यांचे काही जुने-नवे फोटो समोर आले. यावरून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या प्रमुखच अशा प्रकारे भोंदूगिरीला खतपाणी घालत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांचा संदर्भ दिला आहे. आधुनिक काळातही आपण विचारांच्या गुलामगिरीत अडकत चाललो आहोत का, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी