मोठी बातमी! मुंबईतील जैन मंदिर पाडणाऱ्या त्या महापालिका अधिकाऱ्याचं निलंबन

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेलं एक जैन मंदिर मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं होतं, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! मुंबईतील जैन मंदिर पाडणाऱ्या त्या महापालिका अधिकाऱ्याचं निलंबन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 8:13 PM

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या एका पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. हे मंदिर महापालिकेनं पाडलं. देशभरातील जैन समुदायाकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.महापालिकेनं मंदिरावर केलेल्या कारवाईच्या विरोधात आज जैन समाजाकडून अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होते. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे जैन मंदिर पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. नवनाथ घाडगे असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचं नाव आहे, महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेलं एक पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं,या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय चांगलाच संतप्त झाला आहे. जैन समाजाकडून या घटनेचा निषेध करत आज अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात ‘मंदिर तुटा, हौसला नाही’, असे फलक होते.या रॅलीमध्ये स्थानिक नेते देखील सहभागी झाले होते.

जैन समाजाकडून आज अहिंसक रॅली काढण्यात आली. रॅलीपूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली, या आरतीनंतर आंदोलन करण्यात आलं.‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे फलक घेऊन जैन समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनामध्ये महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या, हे मंदिर पुन्हा बांधून द्यावं अशी मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे, या आंदोलनानंतर अखेर आता हे जैन मंदिर पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. विले पार्ले भागातील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात हे जैन मंदिर होतं, हे मंदिर 90 वर्ष जुनं होतं.