TDR scam | नाशिक महापालिकेतला 100 कोटींचा टीडीआर घोटाळा विधिमंडळात गाजला; महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

| Updated on: Dec 23, 2021 | 1:16 PM

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महापालिकेतील बहुचर्चित अशा 100 कोटी रुपयांच्या टीडीआर प्रकरणाच्या घोटाळ्याचे भूत बाहेर निघाले आहे.

TDR scam | नाशिक महापालिकेतला 100 कोटींचा टीडीआर घोटाळा विधिमंडळात गाजला; महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
Nashik Municipal Corporation.
Follow us on

नाशिकः ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेतला 100 कोटींचा TDR घोटाळा विधिमंडळ अधिवेशनात गाजला आहे. याप्रकरणी विधान परिषदेतील आमदार विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर विधिमंडळ सचिवालय आणि नगरविकास विभागाने महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. देवळालीमधील शाळा आणि मैदानाची आरक्षित जागा TDR देऊन विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत केली होती.

असा घडला घोटाळा

नाशिक महापालिकेत 15,630 चौरस मीटर क्षेत्राचा टीडीआर महापालिकेने घेतला होता. त्यासाठी सिन्नर फाटा येथे असलेली जागा नाशिकरोडच्या बिटको चौकात असल्याचे दाखवली गेली. या जागेचा सरकारी भाव 6, 900 रुपये होता. मात्र, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हाच दर 25,100 प्रतिचौरस मीटर लावण्यात आला. त्यातून 100 कोटींचा ‘टीडीआर’ पदरात पाडून घेतला. या घोटाळ्याप्रकरणी अॅड. शिवाजी सहाणे, सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर नगरविकास विभागाकडे तक्रार करून त्यांच्यामार्फत चौकशी लावली होती. विशेष म्हणजे महापालिकेने प्रशासन उपायुक्तांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली. तसेच शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी पुन्हा याबाबत तक्रार केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. आता हा घोटाळा थेट राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात गाजला असून, याप्रकरणी महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

चौकशीनंतर पुन्हा चौकशी

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महापालिकेतील बहुचर्चित अशा 100 कोटी रुपयांच्या टीडीआर प्रकरणाच्या घोटाळ्याचे भूत बाहेर निघाले आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. विधिमंडळानेही चौकशी लावली आहे. त्यामुळे हे प्रकरण येत्या निवडणूक गाजणार हे नक्की. यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उठेल. याचा फायदा कोणाला होईल, हे समोर येईलच. मात्र, चौकशीनंतर पुन्हा चौकशी, असे किती दिवस चालणार, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण होत आहे.

इतर बातम्याः

भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!

VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य