AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमाभागात बससेवा ठप्प, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या भूमिकेमुळे हद्दीवरील गावातून प्रचंड तणाव

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीमाभागाती नागरिकांवर, प्रवाशांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

सीमाभागात बससेवा ठप्प, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या भूमिकेमुळे हद्दीवरील गावातून प्रचंड तणाव
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Dec 07, 2022 | 3:34 PM
Share

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वाद दिवसेंदिवस आता वाढतच चालला आहे. काल कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय संघटनांनीही जशास तसे उत्तर देत कर्नाटकातील वाहनांना काळे फासले होते. त्यामुले आता हा वाद प्रचंड वाढला असून आता दोन्ही राज्यातील बससेवेवर याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.

कालच्या वाहनाच्या तोडफोडीनंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिम्मत असेल तर बेळगावमध्ये येऊन  दाखवा असा इशारा महाराष्ट्रातील राजकारण्यांना  दिला आहे.

तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीमाभागाती नागरिकांवर, प्रवाशांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले.

कालच्या या घटनेनंतर आज सीमाभागात ये-जा करणाऱ्या बससेवेवर परिणाम होऊन या भागातील बससेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

त्याचा परिणाम जनसामान्य लोकांवर झाला असून बससेवा बंद असल्यामुळे सीमाभागातील लोकांना आता पायपीठ करावी लागत आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या काही समस्या असती बेळगाव, निपाणी या शहरांचा आधार आहे. मात्र आता बससेवा बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांना तात्काळा आरोग्य सुविधा मिळणेही अवघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चालू झालेला हा सीमावाद आता कधी मिठणार असा सवाल सीमाभागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू