TET पेपरफुटी प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मान्य केल्या मागण्या!

Dada Bhuse : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. आता भुसे यांनी या आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

TET पेपरफुटी प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मान्य केल्या मागण्या!
Dada bhuse News
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Jul 13, 2026 | 7:58 PM

मालेगाव : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर 4 जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने 12 मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि 8 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मकता दर्शवली व 12 मागण्यांपैकी 7 मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली.

मान्य केलेल्या मागण्या

  • TET पेपर फुटी प्रकरणी दोषी आढळलेल्या लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा. यातील सहभागी व्यक्तींची कुठलीही गय केली जाणार नाही.
  • TET पेपर फुटीनंतर आता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील TET परीक्षा फी आकारली जाणार नाही.
  • रद्द करण्यात आलेल्या TET परीक्षांमध्ये उमेदवारांना कितीही वेळा TET परीक्षेला बसता येईल. त्यासाठी विद्यार्थी यांना कोणतीही वयोमर्यादा असणार नाही.
  • शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आणि ज्येष्ठ शिक्षकांना केवळ टीईटीच्या निकषांवरून पदोन्नती नाकारणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या अशा शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य वर्गातील कामगिरी आणि अनुभवाचे मूल्यमापन करण्यासाठी एक स्वतंत्र पुनरावलोकन प्रणाली सुरू करण्याच्या मागणी संदर्भात महाराष्ट्र सरकार इतर राज्यांमधील या संदर्भात केलेली कार्यवाही याचा अभ्यास करून निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली. पदोन्नती बाबत व कार्यरत शिक्षक यांच्या टीईटी पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने यावर आता भाष्य करणे उचित नाही.
  • पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. पेपर फुटीमध्ये आढलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. टीईटी परीक्षेत  पारदर्शकता आणि शिस्तबद्धता येण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेता येईन का? याची चाचपनी व IBPS संस्थेशी चर्चा सुरू आहे.
  • आर्थिक मागास आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा करण्याचा विषय हा समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाशी निगडित आहे. त्यासाठी त्या विभागाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत केली जाईल.
  • जून 2025 मध्ये झालेल्या TET पात्र उमेदवारांची शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमुळे ऑनलाइन व वेळेत राबविण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रिया पुढील दोन-तीन महिन्यांत होईल. शिक्षण सेवक पदाचा कालावधी एक वर्ष करण्याबाबत अर्थ विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.

विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच बैठक होणार

इतर मागण्यांवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले असून उर्वरित मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिक्षण मंत्री, शिक्षण विभागाच्या अधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच बैठक होणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.

Loading...

यावेळी प्रशांत बोराडे (राज्य प्रवक्ते- सम्यक विद्यार्थी आंदोलन), जितरत्न पटाईत, (वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य), मोहीत दामोदर, संघर्षा संखद, अभय सोनकांबळे, भूषण पाईकराव, कमलेश उबाळे, मिहीर गजबे, किरण सैंदाने, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व, शशी पवार, वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक पूर्व, वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, रोहन मगर, प्रज्योत गायकवाड, रवी पगारे, संदीप रामराजे, शंकर खरात, रोहित बागुल, अनिकेत काशीद, आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us