शिंदेंनी उमेदवार जाहीर करताच उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, थेट आपल्या पक्षाचाही उमेदवार केला जाहीर..
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीने शिवसेना शिंदे गटाला उपसभापतीचे पद सोडले. आता ठाकरे गटानेही आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. संख्याबळानुसार, महायुतीने शिवसेना शिंदे गटाला उपसभापतीचे पद सोडले. यादरम्यान शिंदे गटात या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. अखेर सचिन आहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. शिवसेना शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी अखेर शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या उमेदवार जाहीर केली. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्टच झाले. शिवसेना ठाकरे गटाने नुकताच जगन्नाथ अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली.
जगन्नाथ अभ्यंकर हे विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपसभापतीचे उमेदवार असणार आहेत. या दोघांमध्येच प्रमुख लढत आहे. संख्याबळाचा विचार केला असता शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मोठा डाव टाकला.
शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे गटाने फोडले. ऑपरेशन टायगर राबवण्यात आले. आता खासदारांनंतर शिवसेना ठाकरे गटातील आमदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 6 खासदार ठाकरे गटाचे फोडून थेट मोठी खिंडार ठाकरे गटाला शिंदेंनी पाडली.
हा उद्धव ठाकरेंना मोठा झटका होता. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर एक बैठकही उद्धव ठाकरे यांच्याकडून खासदारांची घेण्यात आली. त्यालाही यश मिळाले नाही. उद्धव ठाकरे दोन दिवस बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदार संघाच्या दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी सडकून टीका केली. यादरम्यान संजय राऊतही या दाैऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव यांच्यावर मोठी टीका उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी केली.